दुख विसरणयासाठी
त्याला भूक लागत नव्हती. झोप तर मुळीच नव्हती. सारखा जीव कोंडल्यासारखा
व्हायचा. श्र्वासोच्छ्वास आताशा जोरात होऊ लागला होता. सुरुवातीला थोडयासा श्रमाने
अतिशय थकायला व्हायचे. आता नूस्त्या हालचालीने हात-पाय गळू लागले होते. माहितीचे
सर्व डॉक्टर झाले. वैद्य झाले. देवधर्मातही कसूर झाली नाही. सगळे उपाय शकले पण
दिवसेंदिवस त्याच्या प्रकृतीची अवस्था बिकट होत चालली होती. हा-हा म्हणता त्याच्या
आजारपणाची बातमी सर्वतर पसरू लागली. जो तो चिंताक्रांत झाला. येणार्यांची तरी
नुसती रीघ लागली होती. शाम आता हालचाल करू शकत नव्हता. बिछान्यावर नुसता तळमळत
पडलेला असायचा. आपल्या दुखण्यापेक्षा आपलं कार्य थंडावतंय, ह्याची त्याला जास्त रुखरुख लागून राहीली होती.
हो त्याचं कार्य होतंच तसं महत्वाचे नि मोलाचे! आपल्या सामाजीक कार्याने
गावच्या ह्या तरुणाने सगळ्या तालुक्यातील लोकांच्या हृदयात मानाचे स्थान मिळवले
होते. हे वसई तालुक्यातील एक छोटेसे गाव. त्या गावातून प्रथम पदवीधर होण्याचा मान
त्याने पटकावला होता. त्या लोकांना त्याच्या विंग्रजीचे कोतूक होते. त्या वेळेस
गावातर्फे घडवून आणलेल्या सत्कार समारंभात तो बोलला होता. ''माझ्या प्रिय गावकर्यांनो,आजचा हा सत्कार माझा एकटयाचा नसून आपल्या सगळ्यांचा आहे.
तुमची मदत व शुभेच्छा, ह्यांचं गाठोडे सतत पाठीशी
असल्यामुळे मी हे यश संपादू शकलो. त्यामुळे आजच्या ह्या सभेत समाजसेवेचे व्रत अंगिकारण्याची
प्रतिज्ञा करून मी तुमचे ऋन अल्पसे का होईना,
फेडण्याचे प्रयत्न
करणार आहे. आज मी केवळ 'दारूबंदी' वर बोलणार आहे. दारू हे विष आहे. तिच्या भजनी जो लागतो तो
बरबाद झाल्यावाचून राहत नाही. आपल्या गावातील किती तरी सोन्यासारखे संसार दारूमुळे
उध्वस्त झालेले आहेत. तुम्हाला स्वतच्या घरचे उदाहरण सांगतो.'
'माझे आजोबा एके काळी मोठे जमीनदार होते. पण दारूचया
व्यसनामुळे त्यांनी जमीनी विकल्या. ऊसाचे सर्व
पैसे ते दारूत उडवत. कर्जाचे ओझे माझ्या तरुण
वडिलांवर लादून ते आयुष्याच्या ऐन उभारीत निवर्तले. आजोबांचे कर्ज फिटवता
फिटवता जेरीस आलेले माझे वडील, ते दुख विसरण्यासाठी दारूचे
व्यसनी बनला. माझे वडील एक आदर्श शिक्षक होते. तालुक्यात त्यांच्या नावाचा दबदबा
होता. पण दारू प्यायल्यावर ते पशू बनत. माझ्या साध्वी आईचा वाटेल तसा छळ करीत.
शेवटी दारूमुळे त्याचे पोट जळले आणि भरल्या संसारात माझी आई विधवा झाली.
त्यामुळे वडीलधार्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की आपण पित असलेली दारू केवळ
स्वतचाच नाश करीत नसते, तर पुढच्या पिढीला देखील भेगा
पाडीत असते'.
'त्यामुळे
'दारूबंदी' हे माझ्या समाजसेवेचे ब्रीद असेल. त्यासाठी तुमच्या
सगळ्यांचे पाठबळ मला हवंय. तुमच्या सहकार्याची मला नितांत गरज आहे. बोला, या सभेतील गावकर्यांपैकी कितीजण आता निश्चय करायला तयार
आहेत की आज पासून आम्ही दारूला शिवणार नाही.''
शाम बोलायचा थांबला. त्याची नजर सार्या सभेवरून भिर-भिरत होती. तेथील सहकारी
सोसायटीची ती वार्षिक सभा होती. सोसायटीचे सभासद व अन्य गावकरी मंडळींनी सभा
खच्चून भरली होती आणि ह्याच सभेत शामचा सत्कार घडवून आणण्यात आला होता. आपल्या
सत्काराला दमदार आवाजात उत्तर देताना त्याने संपूर्ण सभा जिंकली होती. त्याच्या
व-ृत्वाने सगळे भारावले होते. पोटतिडकीने उच्चारलेला त्याचा प्रेरक शब्द गावकर्यांच्या
हृदयापर्यंत जाऊन पोहोचला होता. गावकर्यांच्या भल्यासाठी स्वतच्या मृत बापाची
अब्रू चव्हाटयावर आणण्यास त्याने मागे पुढे पाहिले नव्हते. त्यामुळे प्रत्येकाच्या
मनात त्याबद्दल आदर दुणावला होता. तो बोलायचा थांबला, तेव्हा सभेत थोडीशी कुजबूज झाली. दुसर्या क्षणी सभेतला एक
हात वर आला. नंतर दुसरा. त्या पाठोपाठ तिसरा नंतर अनेक सभेत हजर असणार्यापैकी जे
पिणारे
होते, त्या सगळ्यांनी माना खाली घालून हात वरती केले होते.
शामच्या ओठावर स्मित तरळले. लगेच त्यांचा समाधानी चेहरा गंभीर बनला.
सभा बरखास्त झाल्यावर. शामने सगळ्यांची मने जिंकली होती. मोठया माणसांना
त्याचं कौतुक वाटले. शामला घडवण्यासाठी हातभार लावलेल्यांना त्याचा अभिमान वाटला.
सगळ्या गावच्या चर्चा विषय बनला
तो! सभेत नुसते भाषण करून तो थांबला नाही. गावातील दारू बनवणार्या लोकांना
जाऊन भेटला. लोकांच्या नाशाला त्यांना हातभार लागतो, हे त्यांना पटवून दिले. जे दारू तयार करायचे, तेही बिचारे परिस्थितीपुढे असहाय्य बनून ह्या कुमार्गाला लागले होते. त्यांनी
शामपुढे आपल्या गरीबीचा पाढा वाचला. तेव्हा त्याने निरनिराळ्या लघुउद्योगांची माहिती
त्यांना व सहकारी बँकेतून कर्जाच्या रुपाने मिळवून देण्याची त्यांना हमी दिली. ती
देखील चांगुलपणा जाणणारी माणसेच होती!
''माझ्या प्रिय लोकांनो'' तो धीरगंभीरतेने बोलू लागला, ''आज सोसायटीच्या वार्षिक सभेत
तुम्ही करीत असलेला निश्चय हा कायम स्वरुपाचा हवा. सुरुवातीला खूप कठीण जाईल. पण
हळूहळू तुम्ही जिंकाल. अजिंक्य बनाल. आपल्या गावात अपूर्व आदर्शाचा पायंडा घालू
शकू.'' सगळे तयार झाले. आणि थोडयाच दिवसात, शामला दुवा देत आपापल्या धन्द्यात मग्न झाले.
No comments:
Post a Comment