मराठीसाठी वेळ काढा

मराठीसाठी वेळ काढा

मराठीत टंकनासाठी इन्स्क्रिप्ट की-बोर्ड शिका -- तो शाळेतल्या पहिलीच्या पहिल्या धड्याइतकाच (म्हणजे अआइई, कखगघचछजझ....या पद्धतीचा ) सोपा आहे. मग तुमच्या घरी कामाला येणारे, शाळेत आठवीच्या पुढे न जाउ शकलेले सर्व, इंग्लिशशिवायच तुमच्याकडून पाच मिनिटांत संगणक-टंकन शिकतील. त्यांचे आशिर्वाद मिळवा.

Tuesday, November 10, 2015

बालपणातील धरणगांव - जडणघडण दिवाळी २०१५ अंक

जडणघडण दिवाळी अंकासाठी
jadanghadan@gmail.com


लेख --

बालपणातील धरणगांव

ते घर आता आमचे नाहीआता ते छोटू पाटीलने विकत घेतले आहेत्याची आई आणि आजी निमंत्रण देऊन गेलेल्या आहेत -- ताईएकदा घरी येऊन जा घर अजूनही तुमचच आहेमी खूपदा माझ्या जळगांव दौऱ्यांमधे धरणगांवला जाण्याचा वेळ काढते असेचिंतामण मोरयातहसील कचेरीबस स्टॅण्ड -- पण घरी जात नव्हतेपुढची किती काम राहिलीत अस मनाला बजावूनआज तरी घरी जाण्याचा मोह सोड असा धाक देऊनमी दुसरीकडे वळत होते.

मग एक दिवस ठरवून वेळ काढलाछोटूला आधीपासून सांगाचयी कांय गरज असं म्हणत कुणालाच सांगितले नाहीभाईसाहेबांच्या (काकांच्यामुलांपैकी तेंव्हा फक्त शशीच धरणगांवला रहायचापण त्यानेही आता चिंतामण मोरया जवळ नवं घर बांधलेल होतंतिकडेच रहायचाआयत्या वेळी वाटल तर त्याला सांगायचनाही तर एकटच जायचं असं ठरवून टाकलं.

मोरयाच दर्शन घेऊन रिवाजा प्रमाणे त्या ओट्यावर पाच मिनिटं बसले - - शशी आणि मीरा नेमके आजच बाहेरगांवी गेले होतेआता उठून ड्रायव्हरला सांगायच तिकडे गांवात चलायचय बर आज !

आणि मनांत प्रचंड उलथापालथ झालीअस वाटल की आता घरी जाऊनसर्व घर पुन्हा एकदा नजरेत भरून घेतल्यासारख होणार नाही – ते निव्वळ पुढील काही काळासाठी शिदोरी म्हणून असणार नाहीआज घरी गेले तर परत निघतांना बहुतेक जुन्या सर्व आठवणी त्याच्या उंबरठयापाशी ठेऊनरिक्त होऊन परतेनते दर्शन “पुनरागमनायच” असणार नाहीत्या भेटीनंतर घराशी असलेले भावनिक संबंध संपतीलआठवणी कायम रहातील पण त्रयस्थाप्रमाणेफक्त वस्तुस्थितीदर्शकतो अखेरचा निरोप ठरेल.
मग मी घरी गेलेच नाहीमोरयावरूनच जळगांव गाठलं आणि रात्रीच्या गाडीने मुंबई म्हणून ते घर अजूनही माझंच आहे एक भेट होईपर्यंत तरी नक्कीच!
-------------------------------------------------------------------------------------

खूप जणांना बालपणातल्या अगदी लहान वयातल्या गोष्टी आठवतातमला तेवढया नाही आठवतआई सांगते माझ्या वयाच्या दोन वर्षापर्यंत आम्ही लोणावळ्याला होतो कैवल्यधाम इन्स्टिट्यूटमधे दादा (वडीलनोकरी करतपण त्यांना डॉक्टरेट मिळाली आणि इन्स्टिट्यूटने आता तुम्ही जास्त चांगली नोकरी बघा असा निरोप दिला.

मग आम्हीं धरणगांवी आजोबांकडे (नानांकडेरहायला आलोदादांनी अनुक्रमे खांडवा (मध्य प्रदेश), व्यारा (गुजरातआणि जबलपुरला नोक-या धरल्या असे वयाच्या सातव्या वर्षी मी जबलपुरला आलेतोपर्यंतचा बराच काळ धरणगांवी नानांकडे गेला.

व्यारा येथील घराला मातीच्या भिंती आणि मातीची जमीन होती आणि आई त्यांना बाईकडून शेणाने सारवून घ्यायची हे मला आठवतंत्या तुलनेत धरणगांवला नानांच्या घरांत सर्वत्र फरशी होती फक्त स्वैंपाकघर आणि मडक्याची खोली सोडूनघर उत्तर दक्षिण असं होतं एल या अक्षराच्या आडव्या रेघेसारखंआणि उभ्या रेघेच्या जागी नानांचे धाकटे भाऊ अप्पा यांच घर होतंत्यांच्याकडील बहुतेक खोल्या मातीच्या होत्यामोठ्या चुलत बहिणी सगळी जमीन शेणाने सारवतलांब हात करून छान वर्तुळाकार आणि विविध नक्षींचे ते सारवणे असायचेत्या नक्षी आणि तो वास मला खूप आवडायचाचुलत बहिणींमुळे मला सडा घालणेशेणाने सारवणेयेऊ लागले आणि रांगोळीची कलापणम्हणूनच आजही शेणमातीचिखल हे मला कचरा वाटतच नाहीतउलट व्यवस्थित न वापरलेल्या प्लॅस्टिकचा मात्र खूप कचरा होतो.

माझा आजी वडिलांच्या लहानपणीच वारली होतीदादांच्या काकूलाच सर्व मोठी आई म्हणतखानदेशांत अशी नात्यांची जवळीक फारदूरच्या भावाच्या मामाला देखील सर्व मामाच म्हणणारमाझी आई कोकणस्थ आहेतिला फार पेच पडायचा नाती समजून घ्यायलानात्यांच्या या प्रकारामुळे मोठ्या आईच्या माहेरचेमाझ्या काकूंच्या माहेरचे आणि आईच्याही माहेरचे असे सगळेच मामा मावश्या होत असतत्यांत माझा कधी गोंधळ नाही झाला.

आसपासच्या मिळून एकूण सात घरांना अग्निहोत्री वाडा असे नांव होतेमात्र त्यापैकी एक घर पाटील यांचे व दुसरे एक सुतार यांचे होतेअप्पा आणि पाटीलांच्या कडील गायबैलबकरी वगैरे सामाईक अंगणातच बांधली जातत्यामुळे धारोष्ण दूधसडा-सारवणासाठी हवे तेवढे शेणगुरांची सोबत या गोष्टी रोजच्यातल्या होत्यापाटीलांचा कुत्रा वाघ्या आमचाही लाडका होतात्यांच्या घरी पूर्ण शाकाहार असेमहिन्या-दोन महिन्यातून आमची फेरी त्यांच्या शेतावर होईभुईमूगकापूसहरभराज्वारी ही पिकं नित्य परिचयाची झालेलीज्वारीच्या तोट्यांपासून बैलगाडीसकट निरनिराळी खेळणी आम्ही करत असूशिवाय पत्रावळीद्रोण  बनवणंबुरुड गल्लीत ते लोक दोऱ्या कसे वळतातझाडणीसूपटोपल्या कसे बनवतात हे ही पहायला मोठ्यांपैकी कुणीतरी घेऊन जातरोज गुराखी येऊन गाईंना चरायला नेत आणि संध्याकाळी घरी आणून सोडतगावातील कामे सामाइकरीत्या कशी चालत त्याचा तो नमूना होता.

दादांच्या पडत्या काळातच आईने नागपूरच्या SNDT कॉलेजमधील सोईचा फायदा घेअन बाहेरून बीए करायचं ठरललग्नावेळी ती मॅट्रिक झालेली होती.पण तिला शिकायची इच्छा होतीया बाबतीत नानांचाही फार कटाक्ष होता -- तू हुशार आहेस तेंव्हा शिक्षण पुढे ने असे कायम प्रोत्साहन होतेबीए साठी चार वर्ष लागणार होतीपरिक्षेपुरती दोन महीने नागपूरला होस्टेल मधे राहून अभ्यास करण्याची सोय होतीत्या काळांत मी नानांकडेच असायचीएका आतेचे दोन मुलगे शिक्षणाला त्यांच्या कडेच रहातअधून मधून दुस-या आतेचा मुलगा पण येईएकत्र कुटुंब-पद्धतीचा हा फायदा मी अनुभवला कि सोय असेल तिथे इतर कित्येक जण येऊन आपापला मार्ग प्रशस्त करून घेऊ शकत होतेत्याचवेळी माधुकरी हा प्रकारही मी जवळून पाहिलानाना आणि अप्पा मिळून चार-पाच मुलांची माधुकरीची जबाबदारी उचलतघरात शिजलेल्या स्वयंपाकातून पहिला त्यांचा वाटा बाजूला काढून ठेवतआर्थिक परिस्थितीमिळे कुणाचे शिक्षण मागे राहू नये यासाठी केवढी मोठी सामाजिक जबाबदारी प्रत्येक कुटुंब पार पाडत असे!

काकांच्या घरात माझ्यापेक्षा मोठी माझी चार चुलत भावंडं होतीत्यामुळे माझा सर्व वेळ धुडगुस घालण्यातच जाईमला शाळेत घालायची घाई कुणालाच नव्हतीमात्र आईने मला अक्षर-ओळखपाढेलिहायला वाचायला आवर्जून शिकवलेतर नानांचा सपाटा असायचा सर्व पोरासोरांना तोंडी गणितं घालण्याचाइतर मोठया भावडांना गांगरायला होत असतानाच मी मात्र पटापट तोंडी गणितं सोडवत असेत्यामुळे मी नानांची लाडकी नात होतेत्यांनी मला अगदी लहान वयांत भूमिती पण शिकवली होती .

धरणागांव हे त्या पंचक्रोशीतील मोठं गांवते व्यापाराच ठिकाण होतगांवाला म्युनिसिपाल्टी होती आणि बरेच रस्ते सीमेंट कांक्रीटंचे होतेफरशांनी व्यवस्थित बांधून काढलेला मोठा बाजार होता त्याला कोट म्हणतलांब गिरणा नदीवर धरण बांघलेलं होतगांवात पोस्ट ऑफिसतार ऑफिस आणि हायस्कुल होतशिवाय भुसावळ सूरत लाईन वर धावणारी एक्सप्रेस गाडी देखील धरणगांवी थांबायची इतकं ते मोठं होतंते गाव होत पण खेडं नव्हतं -- तरी पण गांवाला पिण्याच्या पाण्याची पर्मनंट सोय नाही म्हणून ब्रिटिशांनी तालुका ठिकाणासाठी एरंडोल या तुलनेने अत्यंत लहान गांवाची निवड केली होतीयाची खंत सर्व गांवकरी बाळगून होतेअगदी अलीकडे म्हणजे सन् 2000 च्या आसपास धरणगांव हा वेगळा तालुका करण्यांत येऊन धरणगांवी मामलेदार कचेरी आली तेंव्हा आता खंत संपली अस दादांनी बोलून दाखवलंधरणगांवच्या मानाने एरंडोल व इतर गांवे खूप छोटी वाटततिकडल्या नातेवाईकांकडे गेल्यावर मनोमन मला धरणगावात सिमेंटचे रस्तेहायस्कूल, रेलवे स्टेशनपोस्ट-तार ऑफिस असण्याचा अभिमान वाटायचापण पुढे जबलपुर आणि मुंबई पाहिल्यानंतर शहर-गांव-खेडं ही उतरंड मला समजू लागली.

धरणगांवी माझी मोठया चुलत बहिणींबरोबर संध्याकाळी फिरायला जायची ठिकाणं म्हणजे राममंदिरविट्ठल मंदिर हे रोजचेशिवाय कधी लांब जायचे ठरले तर बालाजीनानांचे मंदिर किंवा उलटया दिशेला चिंतामण मोरया बालाजी नानांचे मंदिरही विट्ठलाचेच होते पण त्यांच्या मागच्या अंगणात एक मोठा रथ अणि कृष्ण व पाचही पांडवांच्या पूर्णाकृती मातीच्या मूर्ती होत्यादस-याला त्या रथांत पांडवांना बसवून रथयात्रा निघायची. मधे दंगलींमुळे खूप वर्ष ही प्रथा बंद पडली पण आता नुकतीच पुन्हा सुरू झाली आहे. बालाजी मंदिरात जाण्याच मुख्य आकर्षण ते रथ आणि मूर्ती हेच होतेया शिवाय चुलत भावा-बहिणींबरोबर कोटावर बाजाराला जाणेपोस्टात जाणेदळण आणायला गिरणीवर जाणे हे कमी प्रतीचे उद्योगही होतेमोठा उद्योग होता तो म्हणजे दुकानावर जाण्याचा.

नाना पंचक्रोशीत हुषार म्हणून नांवाजले होतेत्यांच्या काळांत म्हणजे 1890 च्या आसपास कधीतरी ते व्हर्नाक्युलर फायनल (म्हणजे सातवीही त्या काळातली मानाची परीक्षा पास होऊन शाळेत गणिताचे शिक्षक म्हणून नोकरीला लागले होतेपण स्वतःपुरती नोकरी न करता संपूर्ण कुटुंबासाठी असेल असे कांही तरी कर असे त्यांच्या वडिलांनी सांगितल्यावरून त्यांनी शाळेची नोकरी सोडली आणि गांवाच्या अगदी एका टोकाला लाकडाचे दुकान काढलेत्यांचे पाहून कांही मुसलमान मंडळींनी देखील त्याच परिसरांत लाकडाची दुकानेसॉ-मिल इत्यादी काढल्यात्या आठदहा मुसलमान कुटुंबांच्या बरोबर नानांचा चांगला घरोबा होतादुकानावर अर्थातच धाकट्या भावाला पण घेतलेदुकानाचे सामान निवडण्यासाठी नाना गुजरातच कांय तर पार कलकत्त्यापर्यंत जाऊन आलेले होते ते मराठी खेरीज गुजरातीआहिराणी पण छान बोलतआजी लौकर वारली पण स्वतःच्या चारही मुलांचा सांभाळ त्यांनीच केलात्यांना कीर्तनाचा छंद होतागांवात विणकर समाज (साळी समाजखूप मोठा होताहातमागावरच लुगडीधोतरं आणि सतरंज्या उत्तम प्रतीच्या तयार होत असतअशा त्या साळी समाजान नाना व बालाजी नाना मिळून कीर्तन करीत असतहा साळी समाजही बहुतांशी शाकाहारी होताखूप पुढे बिहारमधे गेल्यावर तिथे या तुलनेने मांसाहार जास्तच दिसायचाधरणगांवी केवढा मोठा समाज शाकाहारी होता. या शाकाहाराच्या सर्व कारणांमधे महाराष्ट्रातील पंढरपुर वारी हे ही एक कारण होते हे मोठेपणी जाणवलेसाळी समाजात पूर्ण श्रावणभर नाना आणि बालाजीनाना कीर्तन करीतनाना वारल्यानंतर ती जबाबदारी दादांनी उचलली आणि दर उन्हाळ्याच्या सुट्टीत साळी समाजासाठी महिनाभर ज्ञानेश्वरीचे विवेचन करीत ते थेट १९९९ पर्यंतकीर्तनेपारायणेभागवत-पाठदेवीचा जागर इत्यादि सामूहिक कार्यक्रमांनी सबंध भारतभर समाजातील मूल्ये टिकवून ठेवलीपण आता आधुनिकतेच्या नावाखाली आपण ती समाजमूल्य आणि ते कार्यक्रम या दोघांना हरवत चाललो आहोत असे वाटते.

आमच घर तसं बरच मोठघराच्या पश्चिमेला रस्ता होतात्या बाजूच्या खोल्या बहुधा अडगळीचे सामान ठेवण्यासाठी वापरतमात्र उन्हाळयांत तिथे अंबांच्या राशी येऊन पडत आणी गवताच्या गंजीत ते आंबे झाकून ठेवले जात पिकण्यासाठीत्या मोसमांत माझा आवडता उद्योग असायचा गंजीतून पिकलेले आंबे शोधून खाणंही परवानगी फक्त मला होतीआते-भावांनाचुलतभावांना नव्हतीत्यामुळे मी लहानपणी मनसोक्त आंबे खाल्लेले आहेत -- ते सुद्धा विविध जातींचेघरांत रोज आमरस-पोळीचे जेवण असेपण मला आंब्याचा रस खाणे तोही दूध-तूप-साखर इत्यादी घालून खाणे हा प्रकार कधीच आवडला नाहीकदाचित म्हणूनही मला हवे तेवढे आंबे खायला परवानगी होतीत्या आंब्यांमधे शापू आंबे हा ही एक प्रकार असेम्हणजे काही आंब्यांच्या झाडांवर कुठून तरी शापूचे गुणजनुक चिकटतात आणि त्या झाडाच्या आंब्यांना शापूची वास येऊ लागतोखूप जणांना हा वास आवडत नाहीमला मात्र आवडत असेत्याकाळी आमच्याकडे नित्यनेमाने आंबे विकणारी भागाबाई येत असेतिने भरलेले आंबे कधी शापू असले तर हमखास गिऱ्हाइक कोण हे तिला माहीत असेखूप नंतर मला श्री रणदिवे या आंबातज्ज्ञांनी सांगितले कि शापूची चव हमखास आंब्यात उतरेल असे प्रयोग त्यांना करायचे आहेत कारण त्यामुळे आंब्याची चव स्टॅण्डर्डाइज करता येईल आणि एक्सपोर्टसाठी ते अनुकूल ठरेलएकूण काय तर तऱ्हेतऱ्हेचे आंबे आवडीने खाणे हा मला धरणगांवने शिकवलेला गुणएरवी खूपजण हापूस शिवाय इतर आंबा खाऊच शकत नाहीत.

नानांची एक मजेदार आठवण आई सांगतेमाझा जन्म आमच्या घरांतच झालासकाळीच पोटात काही तरी वेगळ वाटतय म्हणून देवघराची मोठी खोली रिकामी करून तयार करून ठेवली होतीबाळंतपण करण्यासाठी माझी आत्या अणि सुईण होत्यादुपारी नाना जेवायल घरी आले तो पर्यंत माझा जन्म झालेलामुलगी झाली म्हणून जरा हिरमुसले होऊन ते लौकरच दुकानात परत गेलेसायंकाळी दोन तरुण मुले त्यांच्याकडे आलीकधीकाळी त्यांच्या वडिलांनी नानांकडून कर्ज घेतले होते आणि नानांनी त्याची आशा सोडून दिली होतीपण त्या शेतकऱ्याने मरतांना मुलांना सांगून ठेवले - ``अरेत्या सज्जन माणसाचे कर्ज वुडवू नका ``. म्हणून वडिलांचे सर्व कार्य पार पाडल्यावर सर्वात आधी ते दोघे भाऊ नानांकडे दोन हजार रूपये परत देण्यासाठी आले होतेमग नानांचा मूड एकदमच पालटलालगेच सोनाराकडून माझ्यासाठी गळ्यातली सोनसाखळी घेऊन व मिठाई घेऊन पहिली बेटीधनाची पेटी म्हणत घरी आलेगंमत म्हणजे माझ्या वाढदिवसाला पुष्कळदा असे घडते की कुठले तरी जुने येणेमग कधी ते अगदी किरकोळी असेल पण माझ्या वडिलांना मिळत राहिलेले आहेमी लाडकी नात असण्याच एक हे कारणही असेल.

माझ्या लहानपणी दुकानावर नानाअप्पा किंवा अप्पांची दोघं मुले भाईसाहेब काका आणि बाळकाका ही असतत्यांचा दुपारचा जेवणाचा डबा तयार करून घरून पाठवला जाई -तो बहुधा मी व चुलत भाऊ अनिल असे दोघे घेऊन जात असूदुपारच्या उन्हांत पाय भाजायचे म्हणून आम्हीं अगदी पळत जात असूत्या काळांत मुलांना चपला वगैरे चंगळ नसायचीजाता येता पोस्टात जाऊन टपालही आणत असू -- तिथले पोस्टमास्तर तार कशी करावी-- वजन कसे करावे इत्यादी दाखवत असततीच तऱ्हा रेलवे स्टेशनवरही होतीहा घरोबाही आता हरवत चालला आहेएव्हाना दुकानाची वाढ होऊन तिथे फरशी आणि इतरही सामान ठेवले जाऊ लागले होतेपुढे दादांना जबलपुरची बरी नोकरी मिळाल्यावर नानांनी दुकानाचे सर्व व्यवहार भावाच्या नावावर केलेपण आमचे दुकानावर येणे जाणे मात्र कायम राहिले.

नाना व अप्पांच्या दोन घरांच्या मधल्या जागेत सामाईक मोरी आणि मोठी विहिर होतीविहीरीवर तीन रहाट होतेएक आमच्या सामाईक मोरीतील होतादुसरा रहाट नानांच्या चुलत भावाचा होता आणि तिसरा सार्वजनिक -- गांवासाठी ठेवलेला होताहे पण मी शिकलेले एक मूल्यविहीर जरी नानांनी खणलेली होती तरी पाण्याचा एक भागात सर्व गावासाठी होतातिथे सकाळ संध्याकाळ गांवच्या सासुरवाशिणीमाहेरवाशिणींची बरीच गर्दी असाचयीआईकाकूसगळ्या आत्या यांची सगळ्यांशी ओळख आणि मैत्री असेमी पण लहान वयातच रहाटावर पाणी काढायला शिकलेशिवाय दुकानांत जाताना वाटेत एक मोट लागत असेतिथे थांबून पाणी काढणारे बैल पहाणे हा आमचा आवडता छंद होतापुढे माझ्या मुलांना आणि भाचरांना ते धरणगावी आल्यावर मी आणि आई आवर्जून हे सर्व उद्योग शिकवीत राहीलोत्यामुळे ग्रामीण आयुष्याचा थोडाफार लळा त्यांनाही लागलाच.

आमच्या घरून बाहेर पडले की लगेचच मोठा रस्ता येई तो पिठाची गिरणीपोस्ट ऑफिसहायस्कूल वरून बस स्टॅण्डवर जाईत्याच्या दुतर्फा इतर मोठी दुकानं होतीमग एक मोठा कमानीचा दरवाजा होता व त्या पलीकडे आठवडा बाजारासाठी विस्तृत मैदानकमानीवर सुभाषचंद्र बोसांचे मोठे चित्र होते व दरवाज्याचे नांवही सुभाष दरवाजा होतेशिवाय गांवात एक जुनी पडकी इमारत होती व ते घर म्हणजे झांशीच्या राणीचे आजोळ असं लोक सांगतखरं-खोट्याची पडताळणी अजून झालेली नाहीपण एवढं मात्र खरं की त्यामुळे झाशीची राणी व सुभाष हे माझे पहिले बालपणाचे हीरो होतेअसा समृद्ध वारसा असूनही आपण तो जपत नाही -- पुढील पिढीला शिकवतही नाही याची खंत वाटतेफक्त चारपाचशे वर्षांचा युरोपियन संस्कृतीचा इतिहासपण अगदी छोटीशी सांस्कृतिक विरासतही ते लोक जपून ठेवताततिच्या अवती-भोवती म्यूझियमस्मृती-वनग्रंथशाळाइत्यादि वास्तू उभारतात -- ते एक पर्यटन-केंद्र बनून गांवासाठी व्यवसाय पुरवते.

खानदेशांत त्या काळी धाव्याची घरे असायचीम्हणजे असे की घरांच्या भिंती बहुधा माती किंवा विटा-चुनांच्या असतत्यांच्यावर कांक्रीटचे छप्पर कसे चालणारपण इतरत्र असतात तसे कौलाचे छप्पर देखील नसेत्याऐवजी चटया व लाकडी वासे घालून त्यांच्यावर खारी मातीचे थर टाकीतखानदेशांत सर्वत्र तापी नदीच्या गाळांत येणारी माती ही चिकण माती किंवा खारी म्हणून ओळखली जातेतिचे थर टाकले की पाणी खाली झिरपत नाहीतर त्या मातीवरून वाहून जातेभिंतीच्या बरोबर वर एक फूट रुंद आणि एक-दीड फूट उंच अशी परोटी बांधली जायचीधाब्यामधेच मोठी चौकोनी जागा मोकळी सोडली असे त्यांना धारं म्हणतात त्यातून सूर्यप्रकाश खाली घरात जाईपाऊस आला की शिडीने धाब्यावर चढून सर्व धारी त्यांच्या पत्राच्या झाकणांनी बंद करण्यासाठी एकच धांदल उडेगांवातील बरीचशी धाबी एकमेकांना चिकटून असतत्यांच्या वरून कुठेही जाण्यास लहान मुलांना मज्जाव नव्हताखानदेशांत पर्जन्यमान खूप नाहीतसेच वर्षातील आठ महिने तरी कोरडेच त्यामुळे धाब्याची घरे हा सर्वांत स्वस्त पर्याय चालतोखारी टाकायची असेल तेंव्हा ज्या घरांत खारी येईल त्यांच्या आसपासची सर्वजण मिळून खारी उतरवून घेऊन ती धाब्यावर टाकत-- तुझे काम मी का करू हा भाव नसेहाच प्रकार उन्हाळ्यातील बायकांच्या बेगमीच्या कामाबाबतज्या घरी वर्षभरासाठी पापडशेवयाकुरडया करायचे असतील तिथून सकाळी-सकाळी निमंत्रण येईमग इतर बायकांनी आपापले पोळपाट-लाटणे वगैरे घेऊन त्या घरातील बायकांच्या मदतीला जायचेलहान मुलांना तर अशा वेळी खूप कामे असायचीशेवया हातावर पेलून वाळत घालणेपापड वाळत टाकणेलाटून देणे आणि मनमुराद लाट्या खाणेया सर्व प्रिझर्व्हेटिव्ह न घातलेल्यावेगवेगळ्या घराची वेगवेगळी चव असलेल्या साठवणींच्या पदार्थांची चव ही मला अजूनही पर्वणीच वाटतेही खाद्यसंस्कृतीही आपण विसरत चाललो आहोतखरे तर "" पापड-शेवया घालण्याचा सीझन """ असाही आपला एक पर्यटन-सीझन असू शकतो -- हल्ली हुरड्याचा सीझन झाला आहे तसाच.

जबलपुरनंतर दोनच वर्षांत दादांना बिहार सरकारच्या प्रथितयश मिथिला संस्कृत रिसर्च इन्स्टिट्यूट मधे प्रोफेसरशिप मिळालीत्याच वेळी नानांचे निधन झालेतोवर आम्हीं तिघे भावंडं होतोउन्हाळ्याची मोठी सुटी असायचीत्यांमुळे दरवर्षी सुटीत आम्ही धरणगावी येत असूइथल्या शाळेतही मी चुलत भावंडांसोबत जात असेत्यामुळे हे ही धडे पक्के होत असतअशाप्रकारे आम्हा तिघांना मराठी व हिंदी दोन्ही भाषा उत्तम येऊ लागल्यामुख्य म्हणजे वेगवेगळ्या प्रांतांची वेगळी संस्कृतिवेगळा इतिहास आणि तरीही सांस्कृतिक जवळीक मला दिसली आणि भावलीधरणगांवी आल्यावर धुळेअंमळनेरचालीसगांवचोपडा आदि ठिकाणी नातेवाईकांकडे फिरणे होईमनुदेवीपद्मालयउनपदेवचे गरम झरे आणि खुद्द धरणगांवचा चिंतामण मोरयाइथे नेहमी जाणेयेणे होईमुंबई आणि आईचे माहेर--कोकणातले देवरुख इथेही फेऱ्या होत असतशिक्षणानंतर मी भारतीय प्रशासन सेवेत आले व मला केडरही महाराष्ट्रच मिळालेत्यामुळे धरणगांवचे ऋणानुबंध कधी संपलेच नाहीतसंपूही नयेतमी एवढी मानाची परीक्षा उत्तीर्ण झाल्याची पहिली पावती लागलीच मिळालीत्या काळी मंत्री असलेल्या श्री मधुकरराव चौधरी यांनी थेट दरभंगा येथे दादांकडे अभिनंदनाची तार पाठवली.
मात्र इतक्या वर्षांमधे धरणगावात काही बदल निश्चितच झाले आहेतइथला विणकर समाज आपले कौशल्य व त्यातून मिळणारी उपजीविका दोन्ही हरवून बसला आहेविकेंद्रित एकॉनॉमीची जागा सेंट्रलाइज्ड एकॉनॉमीने घेतली आहेत्यामुळे भांडवली गुंतवणूकीसाठी मोठे आर्थिक पाठबळ असलेल्यांपुरता जिनिंगचा व्यवसाय वाढला आहेसुभाष दरवाजा कधीच मोडीत निघाला आणि आता इतर पुतळे असले तरी पुन्हा कोणी सुभाषचंद्र बोसांची आठवण ठेवलेली नाहीगावात हायस्कूल सोबत दोन कॉलेजेस आहेत पण बेरोजगारी आणि बकालपणाही खूप आलेला आहेरस्ते जसजसे खराब होत गेले तसतशी निगा राखलेली नाहीखानदेशातील जवळपास सगळ्याच गांवांची हीच स्थिती आहेतरीही खानदेशी मातीत एक प्रकारची जिद्दटिकाऊपणा आणि आदरातिथ्य आहेअसे मला वाटतेत्यामुळे अचानक या सुरवंटाचे फुलपाखरू होऊ शकते.

मला धरणगांवची एक आठवण आवर्जून नमूद करावीशी वाटतेकॉलेजात असताना सर्वांचे धरणगावी येण्याचे तिकिट काढलेले आणि माझी परीक्षा अचानक पुढे ढकलली गेलीएव्हाना मला रेलवेने एकटीने लांबचा प्रवास करण्याची सवय झालेली होती म्हणून बाकी सर्व मंडळी धरणगावी आलीमी मैत्रिणीकडे राहून परीक्षा आटोपून यायचे असे ठरलेआम्हाला भुसावळ किंवा जळगावला गाडी बदलावी लागत असेजळगांव येण्याची वेळ सकाळी पाच आणि पुढे धरणगांवची गाडी सात वाजता -- त्यामुळे मी घरी यायला आठ तरी होणार हा सर्वांचा हिशोबपण रात्री मी चुकून भुसावळलाच उतरले आणि समोरच भुसावळ-सूरत फास्ट लागली होती ती पकडून पाच वाजताच मी धरणगांव स्टेशनवर उतरलेअंधारी रात्रपण कोटावर जाणारी दोघ -तिघ होती त्यांच्या सोबतीने मी तशा आंधारातच घरी पोचले देखील -- आणि अचानक मला जाणवले -- या गावात आपण कधीही कुठेही बिनदिक्कत जाऊ-येऊ शकतो -- जणू सगळा गांव हे माझ्या घराचे आंगणचगॉन विथ दी विण्ड या कादंबरीतील नायिका म्हणते की कधीही संकट आले की आपल्या जन्मगावी येऊन तिला स्वस्थता लाभे आणि मार्गही दिसे -- तशीच माझीही अवस्था धरणगावच्या बाबतीत आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------





नमस्कार 
माझे शिक्षण बिहारमधे व उन्हाळ्याच्या सुटीत धरणगांवी येऊन इथले वातावरण मनात साठवून घ्यायचे असा तो प्रवास होता. त्यामधे बालकवींची विशेष माहिती नव्हती. फक्त धरणगांव या विषयावर लिहू शकेन, पण तुम्हाला तसे चालत असेल तर. --LM

प्रिय डॉ देशपांडे,
लेख पाठवीत आहे. कृपया पोच द्यावी --LM
प्रति,

माननीय लीना मेहेंदळे madam,
सप्रेम नमस्कार. 
महोदया,
सर्वप्रथम आपल्याला दिवाळीच्या शुभेच्छा. 
जडण घडण मासिकाचा दिवाळी विशेषांक आपल्याला पाठवायचा आहे. आपण पुण्यात असाल तर कोणत्या पत्तावर अंक पाठवावा (फोन नंबरसह ) हे समजल्यास त्यानुसार अंक व मानधनाचा धनादेश पाठवणे सोयीचे होईल. 
आपला नम्र,
सागर देशपांडे 9850038859
------------------------------------------------