कर्नाटकातील रेशीम उद्योग -- अपूर्ण
कर्नाटकातील रेशीम प्रयोग
लीना मेहेंदळे
महाराष्ट्र टाइम्स (४३)
प्रगती, प्रगती म्हणतात ती काय असतं. याचं एक उत्तम उदाहरण म्हणून कर्नाटक राज्याच्या सिल्क एक्स्चेंजकडे वोट दाखविता येईल. वय वर्षे आठ आणि दरंजची उलाढाल ५० लाख रुपयांची म्हणजं वर्षाची उलाढाल १५० कोटी रुपयांची।
रेशीम उद्योग हा कर्वाटकात दोव शतकांपेक्षा जास्त काळा-पासून पाय रोवून बसला आहे. टिपू सुलतानाने क्षीरंगपट्टण येथे तर म्हसूरच्या राजघराण्याने त्याच बहरात या धंद्याला राजाश्रय बेऊन वाढविले. त्याचे पळ आज लोनशे वर्षानंतर असे दिसून येते की संपूर्ण दक्षिण-पूर्व आशिया खंडातील रेशीम कोशांच्या खरेदी विक्रीचे सर्वात मोठे केन्द्र बंग लारजवळील रामनगरम या गावी आहे. कर्नाटकात सुमारे दोन लाख शेतकरी रेशीम कोशांचे वत्पादन करतात. भारतात दरवर्षी तयार होणा-या एकूण ६००० टन रेशीमपैकी कर्नाटकातच ४५०० टन रेशीम उत्पादन होते.
कोशांपासून धागा काढण्याच्या कलापूर्ण व्यवसायात कर्नाटकात आजमितीला सुमारे ८००० त्यांच्यापासून धागा विकत घेऊन कापड विणण्याच्या धंद्यात १५०० तर धाग्याला पीळ देण्याच्या श्रंद्यात १५०० कुटुंबे आहेत. कर्नाटकात तयार होणा-या एकूण भाग्यापैकी सुमारे ६० टक्के धागा कर्नाटकातच खपतो. तर ४० टक्के धागा इतर प्रांतामध्ये विकला जातो.
कोठीवाले
या ढलालांच्या बंगलोरमध्ये व इतर मोकयाच्या शहरांत मठ मोठया कोठया होत्या, म्हणून त्यांना कोठीवाले म्हणत. रेशीम कोश तयार करणार धागा विणणारे व कापड विणणारे हे सर्व गरीब धरातले असत. धागा काढणा-याकडे कोश घेण्यासाठी, तर कापड विणणा-याकडे धागा घेण्यासाठी पैसे नसणार. पण मलाची गचरज तर दोघांना. अशा दोघांना लाभ अंतरावर बसविण्यात येत असं. मग दलालने त्याच्या जम्ह-याला बोलवाचे. हा जम्हरा आपल्या ओळखीतला नाही व निपक्षपाती आहे असे भासविण्यासाठी बंहुत उपाय करावेत. मग सर्वासमोर हाताच्या तीन चोटांच्या नऊ पेरांना एक तं नऊ असा एक-एक आकडा द्यावा. मग दलालने त्याचा होत एका मोठया टॉवेलबजा रुमालाखाली झाकावा व जम्हू-याने त्याच्या कुठल्यातरी बोटाच्या कुठल्या तरी पेसला स्पर्श करावा. नंतर दलालाने जाहीर करावे की, ज्या पेराला स्पर्श केला त्याची संख्या आहे दोन. अशा प्रकारे तीनदा आकडे काढावेत व ती संख्या म्हणजे झाला धागा विक्रीचा भाव. हा नशिवाचा खेल असल्याने, धागा तयार करणा-याने निघेल तो भाव गोड मानून आपला माल दलालच्या तान्यात स्वाधीन करायचा. पण यातही रखलाशी अशी, की रुमालाच्या आतील स्पर्श नेमका कुठे झाला आणि जाहीर काय करायचे, हे सर्वस्वी दलालावर अबलंबून कारण इतर कोणाला रुमालाच्या आतील काय कळणार। धागा घेतल्यावरही दलालाकडून पूर्ण मालाची किमत न मिळता निम्मी किंवा चतुर्थांश अशीच मिळायची.
दलालांची ही म-ेदारी नष्ट करुन रेशीम धाग्याच्या खरेदी व विक्रीसाठी २९८० साली सिल्क एक्सचेंज सुरू करण्यात आले. .या कल्पनेला विरोध करताना दलालांनी न्यायालयात दावा केला की आमचा धंदा वुडतो.
पर्यायाने आमच्या कुठल्याही धंदा करण्याच्या मूलभूत हक्कावर गदा येते. हा दावा अर्थातच
फेटाळला गेला, इतर विरोधही क्रमश बाजूला ठेवून सिल्क एक्सचेंज कर्नाटक शासनाच्या अधिपत्याखाली येत असून, जॉईन्ट डायरेक्टर, सेरिकलचर पर
लघुउद्योग
Wednesday, June 26, 2013
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment