मराठीसाठी वेळ काढा

मराठीसाठी वेळ काढा

मराठीत टंकनासाठी इन्स्क्रिप्ट की-बोर्ड शिका -- तो शाळेतल्या पहिलीच्या पहिल्या धड्याइतकाच (म्हणजे अआइई, कखगघचछजझ....या पद्धतीचा ) सोपा आहे. मग तुमच्या घरी कामाला येणारे, शाळेत आठवीच्या पुढे न जाउ शकलेले सर्व, इंग्लिशशिवायच तुमच्याकडून पाच मिनिटांत संगणक-टंकन शिकतील. त्यांचे आशिर्वाद मिळवा.

Monday, June 24, 2013

गुजरात भूकम्पाच्या नंतर लोकसत्ता

गुजरात भूकम्पाच्या नंतर

याची दोन उदाहरण सांगता येतील - गुजरात भूकंपाच्या वेळी शासनातील सगळे विभाग एकत्रित येऊन आणि देशालाही विश्र्वासात घेऊन पुनर्वसनाच काम करत आहेत अस चित्र कुणाला दिसल? किंवा गुजरात दंगली- नंतर तरी कुणाला दिसल? त्या आधी ओरिसा मधील वादळात कुणाल दिसल?

दुसरं उदाहरण घेऊ या. देशासमोर संपूर्ण देशाच्या प्हणता येतील अशा दहा सर्वांत समस्या कोणत्या आहेत आणि त्यांच्या सोडवणूसाठी कांय करता येईल या बद्दल कुठलीही यंत्रणा सातत्याने, दर महिन्याला विचार- विनिमय करते कांआणि ज्या जनतेकडे सार्वभैम सत्ता आहे म्हणतात त्या जनतेला त्या बद्दल विश्र्वासात घेतले जाते कां?

प्रधानमंत्री सर्व मंत्र्यांबरोबर किंवा कँबिनेट सेक्रेटरी सर्व सेक्रेटरी बरोबर अशा प्रश्नांबाबत सातत्याने, ठराविक मुदतीत चर्चा करतात कां? कुठल्याही खात्याचे मंत्री त्यांच्या खात्याच्या परफार्मन्स बद्दल खात्यातील सर्व सहसचिव व त्या वरील  अधिकान्यां बरोबर सातत्याने - ठराविक मुदतीत चर्चा करून त्यांची मते ऐकून घेतात का? त्यांच्या मधे ब्रेनस्टॉर्मिंग नामक कांही घडते कां?


भी महराष्ट्रात सेटलमेंट कमिशनर असताना दर महिन्याला सर्व विभागीय अधिकार्‍यांबरोबर बैठक घेत असें.त्या मधे मी अशी पद्धत सुरू केली की वेगवेगळ्या विभागातील दोन दोन अधिकारी प्रत्येक विभागीय मीटींगला बोलवायचे आणि आम्हीं ठरवत असलेल्या योजना प्रत्यक्ष गांवपातळीवर उतरवत असनांना त्यांना कांय अडचणी येतात त्या त्यांच्या तोंडूनच ऐकायच्या. या मुळे आम्हाला खात्याच्या कामात कित्येक सुधारणा करता आल्या.

No comments:

Post a Comment