मराठीसाठी वेळ काढा

मराठीसाठी वेळ काढा

मराठीत टंकनासाठी इन्स्क्रिप्ट की-बोर्ड शिका -- तो शाळेतल्या पहिलीच्या पहिल्या धड्याइतकाच (म्हणजे अआइई, कखगघचछजझ....या पद्धतीचा ) सोपा आहे. मग तुमच्या घरी कामाला येणारे, शाळेत आठवीच्या पुढे न जाउ शकलेले सर्व, इंग्लिशशिवायच तुमच्याकडून पाच मिनिटांत संगणक-टंकन शिकतील. त्यांचे आशिर्वाद मिळवा.

Wednesday, October 14, 2009

3/ तारा : लिंगभेदावर एक तीव्र प्रकाशझोत

तारा : लिंगभेदावर एक तीव्र प्रकाशझोत
लीना मेहेंदळे

मागे गोव्यात झालेल्या निवडणुकींमधे निवडणूक आयोगामार्फत केंधीय निरीक्षक म्हणून माझी नेमणूक झाली होती. त्या वीसेक दिवसांच्या दौर्‍यात गोव्यातल्या राजकीय वातावरणासोबत राजकारणाच्या पलीकडच गोवा पण पहायला मिळाल. तेवढ्यातल्या तेवढ्यात पणजी येथे कला अकादमी मधे एक इंग्लिश नाटक पण बघून टाकल -- तारा. त्याचीच ही अंतर्मुख करणारी गोष्ट. तारा म्हणजे स्त्रियांच्या प्रश्नांना एका वेगळ्या अंगाने हात घालणारे - अत्यंत संवेदनशील नाटक. महेश दत्तानी या साहित्य अकादमी विजेत्या नाटककाराने लिहिलेलं आणि गोव्यातल्या दि मस्टर्ड सीड आर्ट कंपनीच्या गुणवंत कलाकारांनी पेश केलेल. यासाठी कंपनी सांभाळणारे, विशेषतः इंग्रजीच्या प्राध्यापिका इसाबेल वाझ, आणि त्यांचे तरूण सहकारी मिशेल, जॉन पिन्हेरो, विवेक, जोन आणि इतर कलाकारांना धन्यवाद दिले पाहिजेत.
ही गोष्ट आहे चंदन आणि तारा या जुळ्या भावंडांची! ती नुसतीच जुळी नसतात तर सियामी जुळी असतात. म्हणजे एकमेकांना चिकटलेली, आणि कांही अवयव दोन्हीं शरीरांसाठी कॉमन असलेली! अशा जुळयांना वेगळं करणारी ऑपरेशन्स अत्यंत कठिण असतात आणि या मुलांचे जगण्याचे प्रमाणही कमी असते -- सुमारे पाच ते दहा वर्ष. सामान्यपणे अशी जुळी एकाच लिंगाची असतात. इथे भिन्न लिंगामुके काम्प्लिकेशन वाढलेले। तरीही ऑपरेशन यशस्वी होते, त्यासाठी डॉक्टर उमा ठर हिला अंतर्राष्ट्रीय ख्याति, व मानसन्मान मिळतात. मुख्यमंत्री होऊ घातलेले मुलांचे आजोबा तिला मोठी इन्स्टिट्यूट काढण्यासाठी बंगलोर मधे प्राईम लॅण्ड मिळवून देतात!
संपूर्ण नाटकभर स्टेजच्या एका बाजूला उच्चासनावर बसून योग्य त्या प्रसंगी डॉ. उमाने या ऑपरेशन मधल्या तसेच त्या मुलांच्या पुढील आयुष्यांत आलेल्या मेडिकल काम्प्लिकेशन्स बद्दल भाष्य केले आहे. हे स्टेज संयोजन खूप परिणामकारक झाले आहे.
नाटक उघडतं तेंव्हा चंदन पुढच्या शिक्षणासाठी इंग्लंड मधे आलेला असतो. बालपणापासूनच तो 'लेखक' होणार हे ठरलेलं असतं -त्याचा 'स्पार्क', त्याचं आत्ममग्न आणि अल्पसंतुष्ट रहाण, शांत आणि समाधानी वृत्ति ही घरात सर्वांना परिचयाची असते. तो एव्हाना पंचवीस वर्षांचा असतो. तारा मात्र सतराव्या-अठराव्या वर्षीच मरण पावलेली असते! त्याच्या सर्व भावनात्मक आंदोलनांची साक्षीदार, त्याला जीव लावणारी अशी तारा - तिच्या मृत्युच्या आठवणींनी तो व्याकुळ होतो - त्यातूनच फ्लॅशबॅक पद्धतीने नाटक उलगडत जाते.
एक चौकोनी कुटुंब -- पटेल, भारती आणि त्यांची सतरा-अठरा वर्षांची दोन मुलं - चंदन आणि तारा नुकतेच बंगलोर सोडून या शहरांत येऊन राहिलेले. मुलं नुकतीच मॅट्रिक झालेली -- हुषार ! शेजारी पाजारी अजून फारशा ओळखी नाहीत. भारती एका ीमंत कानडी आमदाराची एकुलती एक मुलगी असते आणि एकेकाळी सामान्य आर्थिक परिस्थिती असलेल्या गुजराती पटेल बरोबर प्रेम विवाह करते - तेंव्हापासूनच त्यांच्या घरावर भारती व तिच्या वडिलांचाच शब्द चालतो - तो अलीकडेच आमदार हयात असेपर्यंत. मरतांना देखील त्यांनी
आपली अफाट संपत्ति चंदनच्या नावे केलेली. भारती अजूनही हट्टीच असते. ी पटेल सध्या ीमंत - एका मोठया फॉर्मास्यूटिकल कंपनीचे मालक असतात.
चंदन आणि तारा 'फिजिकली हॅण्डिकॅप्ड' असतात. हेच ते सियामी जुळ्यांच कॉम्प्लिकेशन - जन्माच्या वेळी त्यांचे डोके, हृदय, आणि पोट हे अवयव वेगवेगळे असले तरी एका बाजूने कमरेपासून मांडीपर्यंत भाग जुळलेला असतो. ऑपरेशन करून ते भाग वेगळे केलेले असतात पण एक एक पाय कायमपणे अधू ठेऊनच। त्यामुळे दोघांना जयपूर फूट बसवावे लागतात - वाढत्या वयाप्रमाणे ते सतत बदलावे लागतात। जुळलेल्या शरीरामधे चार किडन्यांऐवजी दोनच असतात त्यामुळे दोघांना एक एकच किडनी मिळते. पण या व्यंगांवर मात करून, एकमेकांना एकमेकांच्या हुषारीची साथ देत दोघांनी शालेय शिक्षण पार पाडलेलं असतं. दोघांमधे एक अत्यंत जिवाभावाचं नातं आणि एकमेकांची जाण असते.
मात्र ताराची किडनी हळू हळू कमजोर झालेली असते. आता तिच्यासाठी दुसरी किडनी गरजेची. त्यामुळे तिच्या दिनचर्येवर मर्यादा पडतात. ती कॉलेजात जाऊ शकणार नसते. पण या नव्या शहरांत तारा शिवाय एकट्याने कॉलेजात जायला चंदन नाखूष असतो. वडील त्याला स्वतःच्या ऑफिस मधे 'धंदा सांभाळायला' शिकण्यासाठी नेऊ पहातात - पण तिथेही तो तारा शिवाय जायला तयार नाही। इकडे तारा महत्वाकांक्षी असूनही कॉलेज व ऑफिस दोन्हीं साठी अपात्र. तिला किडनी देणारा 'डोनर' पण वडिलांनी शोधून ठेवला असतो पण आईचा हट्ट असतो की तिचीच किडनी मुलीला 'ायची.
तिने नीट जेवावं, ज्यूस, दूध इत्यादि शक्तिवर्द्धक पेयं घ्यावीत, तिच्या आवडीचे पदार्थ घरात तयार व्हावेत म्हणून आई आग्रही. वडिलांच्या तोंडून वारंवार 'आय हॅव्ह प्लान्स फॉर यू' असे शब्द फक्त मुलासाठी निघतात. भारती छेडते तेंव्हा ते म्हणतात 'तू मला मुलीसाठी प्लानिंग कधी करू देतेस, तू तिचा पूर्ण ताबा घेतला आहेस'. चंदन वेळोवेळी ताराची समजूत काढतो, तिला धीर देतो, तिच्या साठी गोष्टी, लेख लिहितो, तिला आवडणारं म्युझिक विकत आणतो, आणि प्रसंगी 'कंपोज' ही करतो. सगळी वाट पहाताहेत तिच्या ऑपरेशनची. सर्वांना टेन्शन.
पटेलही टेन्शन धेऊन आहेत पण ते टेन्शन तारासाठी नसून भारती साठी आहे. तिला मनोवैज्ञानिक सल्ल्याची गरज आहे. तिने स्वतःची किडनी ताराला 'ायचा आग्रह धरू नये, सारख ताराच्या मागे मागे राहू नये - तिला थोड 'स्वतंत्र' राहू 'ावं असा पटेलचा सल्ला. त्यावर भारतीचं ब्लॅकमेलिंग - पहा हं, नाहीतर मी ताराला सर्व कांही सांगून टाकेन. मग दोघांच भांडण - 'नाही, सांगायचच झाल, तर ते मी सांगेन - तू तिच्याजवळ या बद्दल चकार शब्द काढायचा नाही !'
तारा आणि चंदनची समवयस्क शेजारीण रूपा - जराशी ढ असणारी पण टिपिकली ीमंत, त्या वयांत असणार्‍या ईर्ष्या, द्वेषांसकटची मुलगी - थोडीशी उच्छृंखल. घरात आई व्हिडियो पिक्चर्स पाहू देत नाही म्हणून चंदन ताराशी मैत्री करते. इतर मुल-मुली कशी 'नास्टी' आहेत - चंदन ताराच्या व्यंगाबद्दल कांय कांय बोलतात हे खुलवून सांगणारी - पण ती दोघं हे मनावर घेण्या-यांपैकी नसतात. एकदा ताराची आई नको नको म्हणत असतानाही ती ताराला एक सिद्भेट सांगून टाकत असल्यासारखं शेजारीण कांय म्हणाली ते सांगते - या पटेल लोकांमधे ना, विचित्र पद्धत असते -- मुलगी जन्माला आली ना, तर तिला लगेच दुधाच्या घंगाळात बुडवून ठार मारून टाकतात ! ..... पुढे डायलॉग - 'व्हाट ए वेस्ट ...... ऑफ मिल्क !'
असे तीव्र चिमटे घेणारे डायलॉग्स नाटकात अधून मधून पेरलेले आहेत।
पुढे ताराच ऑपरेशन होतं - भारतीचा हट्ट नाकारून डोनरचीच किडनी दिली असते - पण तारा घरी येते तो भारतीला मनोरूग्णांच्या दवाखान्यांत ठेवलेल असत. तिला पहायला चंदन जात नसतो - कारण त्याला लहानपणा - पासूनच दवाखान्यांचा तिटकारा आणि नॉशिया असतो.
तारा अगदी हळू हळू बरी होणार असते। आईला भेटायला फक्त ती आणि वडील जात असतात. आणि तिच्या लक्षांत येतं की आईला आपल्याला एकटीला कांही तरी सांगायच आहे. म्हणून ती एक दिवस ड्रायव्हर बरोबर एकटीच जाते.
घरांत चंदन एकटा - तोच रूपा एक व्हिडियो कॅसेट घेऊन येते - ही नाझी कन्सन्ट्रेशन कॅम्प वरील एक फिल्म असते - सोफीज चॉईस ! त्यावर चर्चा होते. चंदनच्या मते फिल्मच नाव असायला पाहिजे होत - 'देअर वॉज नो चॉईस !' कारण या गोष्टीत नाझी कन्सन्ट्रेशन कॅम्प मधल्या एका गरोदर बाईला जुळं होणार असतं, तिला कॅम्प मधून सुटून जायचा परवाना मिळालेला असतो - पण बाळंतपणानंतर आणि एकाच मुलासोबत. डिलिव्हरी होते तेंव्हा तिला एक मुलगा आणि एक मुलगी झालेली असते - त्यातून तिने निवड करायची असते। कुणाची निवड करणार ती ? कोणतीही आई कसा काय निर्णय करू शकते ? इथे लेखकाने सोफीज चॉईस या गाजलेल्या कादंबरीचा छानच उपयोग करून घेतला आहे. रूपाच्या अंगावर शहारे येतात ! ती म्हणते - छेः, यापेक्षा मुलीला दुधांत बुडवून मारून टाकणच जास्त सुसंस्कृत !'
मग तारा येते - तिला आईची भेट नाकारलेली असते - दवाखान्यांत वडिलांची स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन असते की ताराला एकटीने आईला भेटू 'ायचे नाही.
तारा वैतागते. ती वडिलांविरूद्ध चंदनची मदत मागते - आधी तो तिला समजावतो की तारा, ते तुझे शत्रू नाहीत, तुझ्या भल्यासाठीच ही सूचना असेल. पण ताराच्या मनांत एव्हाना एक सूक्ष्म अढी निर्माण झालेली आहे की आईचं आपल्यावर खूप प्रेम आहे, वडिलांचं मात्र नाहीं. शेवटी तो वडिलांना पटवण्याचे आश्र्वासन देतो. रात्री दोघं वडिलांना खिंडीत गाठतात. त्यांनी वेळोवेळी तारा आणि चंदनला वेगवेगळी वागणूक दिलेली असते - त्यावर बोट ठेवतात. आतादेखील आई ताराला काही सांगू पहात आहे, तेही ऐकायची परवानगी नसणं हा किती मोठा अन्याय. शेवटी पटेल मनाशी निर्णय घेत. ठीक आहे तर मग भारतीने तुम्हाला ते सिद्भेट सांगण्याआधी मीच सांगून टाकतो - ऐका तर ------!
आणि नाटकाचे रहस्य उलगडते । चंदन आणि ताराच्या जन्माच्या वेळी ती जुळलेली असतात हे खरे. पण दोघांना मिळून तीन धडधाकट पाय असतात. तो 'तिसरा' पाय नैसर्गिक रीत्या ताराच्या शरीराचा असतो पण ऑपरेशनच्या वेळी तो कापून काढून चंदनच्या शरीराला जोडावा असं भारती आणि भारतीचे आमदार असलेले वडील यांना वाटतं. ऑपरेशनचा हा टप्पा यशस्वी झाला तर चंदनला दोन चांगले पाय मिळणार असतात. म्हणून ती दोघं पटेलच्या मनाविरूद्ध निर्णय घेतात - त्यासाठी डॉक्टर ठर वर दबाव आणतात ! तिला बंगलोर मधे प्राईम लॅण्ड दिली जाते - मान सन्मानांच आश्र्वासन दिल जातं ! मेडिकल एथिक्सच्या विरूद्ध असूनही डॉक्टर तसे ऑपरेशन करते. तारा दुबळी होते ! आणि चंदनच्या शरीरावर कृत्रिमपणे आरोपण केलेला तो तिसरा पाय त्याच्या शरीराशी एकरूप होऊ शकत नाही. शेवटी तोही निर्जिव होऊन गळून पडतो----!
असा हा सुन्न करून टाकणारा शेवट. स्त्री संततिची हत्या, स्त्री भ्रूण हत्या, मुलगी झालीच तर तिला निष्काळजी पणे वागवणे - इत्यादि विषयांवर निबंध खूप वाचले, लिहिले जातात । पण इतक्था मर्मभेदक रीतीने हा विषय हाताळणे, आणि तेही एका खिळवून ठेवणार्‍या 'कॉमर्शियल' नाटकाच्या माध्यमातून -- हॅट्स ऑफ टू मिस्टर दत्तानी ऍण्ड दि मस्टर्ड सीड आर्ट कंपनी !
---------------------------------------------------------------------------
पत्ता : ई - १८, बापू धाम, चाणक्यपुरी, नई दिल्ली, ११००२१

1 comment: