मृत्युंजयी सावित्री आणि रुपकुंवरचे सती जाणे
शेवटी एकदा रुपकुंवर सती केसचा निकाल लागला. (की निक्काSल लागला?) आणि न्यायालयाने निवाडा दिला की यांत कोणीही दोषी नाही- कुणीही तिची हत्या केली नाही. ती आपण होऊन सती गेली | ती किती उदात्त ठरली |
ती सती गेली अगर घालवली, पण जाता जाता देशातल्या बुरसटलेल्या विचारसरणीवर बुरशीचा आणखीन एक जाड-जूड थर पसरवून गेली | रुढीवादितेत भर टाकून गेली | स्त्रीच्या अबला पणाचे हे उदाहरण पाहून जेवढया लोकांच्या मनात आक्रोश उठला असेल त्यापेक्षा कित्येक पट जास्त लोकांना कित्येक पट तीव्रतेने अस वाटल की हाच नारी जीवनाचा आदर्श आहे आणी जिने हा आदर्श घालूनप दिला ती देवी झाली |
या घटनेच्या जमाम बातम्या वाचत असतांना जेवढी हळहळ मला रुपकुंवर आणी आपल्या समजाबद्दल वाटली तेवढीच हळहळ वाटली एका पुराणकालीन महिलेबद्दल. कारण या सर्व प्रकरणांत तिच्यावर अन्याय होत आहे - तिची प्रतिमा डागाळत आहे, तिच्यावर कलंक फासला जात आहे | ती दिव्य स्त्री आहे सावित्री | आपल्या समाजाची अधोगति यापेक्षा जास्त कांय असू शकते की एरवी जी नारी शौर्याच प्रतीक आहे, चंडीपेक्षाही उग्र आणी उत्कट आहे, जेता आहे, मृत्युंंजयी आहे तिच्या नांवाचे दाखले देत देत, तिची माळ जपत-जपत, दुस-या एखाद्या स्त्रीला मूक, दुबळयश-भित्र्या बलिदानाला भाग पाडल जातय |
बालपणापासूनच सावित्री या व्यक्तिमत्वाने माझ्या स्वप्नदर्शी मनाचा पगडा घेतला होता. किशारोवस्थेत तर तीच माझी आदर्श झाली होती. तिच्या जीवनकहाणीतील कितीतरी आव्हानांनी माझ्या मनाला भुरळ घातली होती. ती एका विस्तीर्ण साम्राज्याची राज्यकन्या व एकुलती एक वारस होती | घोडेस्वारी, युध्दकला, शस्त्रप्रयोग आणी रथ संचालनालत ती अत्यंत निपुण होती. वडिलीांबरोबर युध्दाच्या आघाडीवर जात होती | त्याही काळात स्वयंवरे होत असत आणी स्त्रीला स्वत:चा पति निवडायचा अधिकार होता. पण एवढयावर सावित्री संतुष्ट नव्हती. स्वयंवराला येणारे फक्त तिच्याशी लग्नाला इच्छुक असणारे पुरुष येणार | पण ती त्यांच्याशी लग्नाला इच्छुक असेलच अस कुठे आहे ? तेंव्हा ही स्वत:च वरसंशोधनाच्या मोहिमेला निघाली | निवड केली सत्यवानाची जो त्यावेळी अतिशिय दरिद्री व विपन्न अवस्थेत होता | त्याचे आई-वडिल वृध्द व दृष्टिने अधू होते | सत्यवानाच्या समोर त्यावेळी एकच ध्येय होत - आईवडिलांची सेवा करणे | इतर कुठल्याही कामासाठी त्याच्याकडे वेळ नव्हता | अस असूनही सावित्रीने त्याच्यात नेमक कांय पाहिल असेल की त्यामुळे त्याला पती म्हणून निवडावा ? तिला कांय आत्मबलिदानाच उदाहरण घालून द्यायच होत ? का लोकर्झ््रिंळ्ना दाखवूुन द्यायच होत की स्त्रीने कर्ुिंझ््रळ् खाली मान घाजलून, आपले अश्रु मनांत कोंडून ळठेवून दारिद्रृयात जीवन कंठाव ? मुळीच नाही. तर मूभ् कथेत असा उल्लख्ेख आहे कि सत्यवानाची निवड करतांना सावित्रीने त्याच शील पाहिल ज्ञ् त्याच सत्यवादितेच, खरेपणाच व्रत पाहिल आअणी पूर्वकाळातील त्याच्या शौर्याच्या आख्यायिकाही विचारांत घेतल्या | त्याच धैर्य आणी कष्टाला न कंटाळण्याच सामर्थ्य पाहिल | या सर्व गुणांचा विचार करुन मगच तिने सत्यवान हा आपला पति म्हणून निवडला |
निवड करुन सावित्री घरी परतली आणी आपल्रे मनोगत पित्याला सांगितले तेंव्हा खळबळ माजली | सत्यवानाची दरिद्री अवस्था हे एक कारण होतच. पण मुख्य म्हणजे ज्योतिषांनी अस भाकित वर्तवल की त्यांच्या शास्त्रानुसार सत्यवानाच्या कुंडलीत एका वर्षाच्या आत दुर्निवार मृत्युयोग आहे |
आपल्या अंधश्रध्दा निर्मूलनवाल्न्यांनी अजून ही गोष्ट वाचलेली नाही | त्यांना माहीत नाही कि सावित्रीने त्या काळात त्या ज्योतिषी मंडळींना चॅलेंज केल होत. तिने विचारल - माझ्या कुंडलीत तुम्हाला वैधव्य किती प्रतिवियोगाचा योग दिसतो कां ? मग
झाल तर | मग मी याच्याशीच लग्न करणार | तुम्ही आपली बेरीज-वजाबाकी करीत बसा आणी ठरवा कुणाची कुंडली कशी प्रभावशाली ठरणार ते |
अशी सावित्री - एरवी दैनंदिन जीवनात आपल्या वडीलधा-यांचा आदर आणी मान ठेवणारी | पण गरज पडली तेंव्हा त्यांना चॅलेंज करु शकणारी | तिच्या चरित्रातला हा गुण पुढेही दिसून आलाच |
विवाहानंतर पित्याने सांगून पाहिले की तिची समस्त सासरमंडळी त्याच्याच राज्यांत, त्याच्याच घरी येऊन राहू शकतात. पण तेही सावित्रीने ऐकले नाही. जर सत्यवान रापुत्र असूनही कष्टमय जीवनाला घाबरत नसेल, जर त्याचा हाच गुण तिला भावला असेल, तर तो गुण टाकून देण्याचा आग्रही सत्यवानाला का करायचा ? त्यापेक्षा स्वत: तो गुण उचलायला कांय हरकत आहे ? ती राजमजलातून निघून जलंगलातील झोपडीत रहायला आली. मात्र इतर स्त्रियांप्रमाणे फक्त घरांत बसून राहिली नाही. सत्यवानाबरोबर जंगलात जाऊन काम करु लागली. त्याचे कष्ट दोघांनी वाटून घेतले. आणी मला खात्री आहे की त्या कामाच्या त्रासापेक्षा सहवासाचा आनंद हाच दोघांना जास्त वाटला असणार | आणी मग तो क्षण आला | सत्यवानाच्या देहातून आत्मा काढून नेण्यासाठी स्वत: यमराज आले | आपण सामान्य माणसं ; मृत्युच्या कल्पनेनेच घाबरुन गेलो असतो - डोळे मिटून घेतले असते. पण तिच्यात हिम्मत होती. मृत्युच्या मागे आपण होऊन चालत जायची | ते बलिदान नव्हत, सती जाण पण नव्हत | ते खुद्द यमराजावर पाळत ठेवण होत | स्वत: यमाने तिच्या निडरपणाची प्रशंसा केली आणी म्हटल की तू शूर आहेस, निडर आहेस, सत्यवादी आहे, म्हणून मला न भिता पाहू शकतेस आणी तुझ्याशी मी ----------- मला बाध्य करु शकतेस | आपल्या जगातल्या, कोणत्याहि धर्मग्रंथांत, इतिहासात निडरपणाच अस दुसरं एकच उदाहरण मला सापडत ते म्हणजे नचिकेत याच. ज्याने यमराजाला गुरु बनवून त्याच्याकडून सत्यधर्म काय ते शिकून घेतल | पण सावित्रीच्या बाबतीत तर यमराज हा शत्रूपक्ष होता
आणि हे उदाहरण फक्त निडरपणाचच नाही आशंकेच्या त्या वातावरणांत पण सावित्रीचे मनं स्थिर होत आणी बुध्दि जागरुक होती. इथे तिच युध्दकौशल्य उपयोगाच नव्हत | तिच्या बुध्दिचातुर्याचा मुकाबला होता - एका आकाशदेवते बरोबर | आपली जागरुक बुध्दि, विनम्रपणांतून यमराजाला गाफील करण आणी अखेरपर्यन्त टिकवून ठेवलेली चिकाटी आणी तर्कशुध्दता या बळावर तिने यमराजाला पराभूत केला. यम सावित्री संवाद विवरण इथे मी सांगत नाही - कारण तो सर्वांना माहीत आहे. पण शेवटी यमराजाने सत्यावानाचा आत्मा त्याच्या देहात परत घातला. पुढे त्यांना सर्व ते-हेचे जय, यश ृ, समृध्दि, राज्य मिळत गेले ती कथा पण सर्वांना माहीत आहे.
पण त्या उपलब्धीच्या क्षणी सावित्रीचा आनंद कांय असणार ? मी खूपदा त्या विजयाची कल्पना करुन पाहिली | पण आपल्यापैकी कुणालाही अशा विजयाच्या जवळपास तरी जाता येईल कां ? ती विजयिनी, गर्वाने मान उंच करुन परतली असेल. पुढला सर्व लखलखीत भविष्यकाळ ओढून पदरांत बांधून आणल्याचा उल्हास तिच्या श्रीमुखावर झळाळला असेल | अशा गर्वोन्नत स्त्रीच्या नांवाने दुस-या स्त्रीला मान खाली घालून जगायला आणी मान खाली ठेवूनच मरायला आपण शिकवतो | जिने मृत्युला जिंकले तिचे नांव घेऊन आपण दुस-या स्त्रीला दुर्बळेपणाने मृत्यूचा स्वीकार करायला भाग पडतो | तोच आदर्श आहे अस तिला व स्वत:ला पटवायचा प्रयत्न करतो | सती या शब्दाचा अर्थ आहे - जिच्यात सत्य आहे, सत्व आहे आणि स्वत्व आहे अशी स्त्री | जिच्यात हे गुण असतील ती स्त्री मृत्युंजय होण्याची अधिकारिणी आहे. तेच विशेषण आपण लावतो. अशा स्त्रीला जिला समाजाने दाबून टाकल आणी जी प्रतिकार करु शकली नाही. विजयाचे असं म्हणतात की राजस्थानात प्रत्येक गांवात सती सावित्री मातेच मंदिर आहे. या मंदिरात जाणा-या प्रत्येक स्त्री पुरुषाने स्वत:वर ही अट घालून घेतली पाहिजे “मी मृत्यु विजयाची दृढता बाळगत असेन तरच मला या मंदिरांत प्रवेशाचा हक्क आहे | ”
Thursday, September 24, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment