मराठीसाठी वेळ काढा

मराठीसाठी वेळ काढा

मराठीत टंकनासाठी इन्स्क्रिप्ट की-बोर्ड शिका -- तो शाळेतल्या पहिलीच्या पहिल्या धड्याइतकाच (म्हणजे अआइई, कखगघचछजझ....या पद्धतीचा ) सोपा आहे. मग तुमच्या घरी कामाला येणारे, शाळेत आठवीच्या पुढे न जाउ शकलेले सर्व, इंग्लिशशिवायच तुमच्याकडून पाच मिनिटांत संगणक-टंकन शिकतील. त्यांचे आशिर्वाद मिळवा.

Monday, October 8, 2012

सहा ऋतूंचे चक्र फिरतसे

झुळझुळ वारे वाहू लागले लाल पालवी तरूवरी
     फुलाफुलांनी भरल्या वेली आंबेराई मोहरली
आभाळाचे निळेनिळेपण कुहूकुहू कोकिळा करी
     आनंदीआनंद गड्यांनो वसंत आला घरोघरी

ग्रीष्म पातला सूर्य़ तारला ऊन कडक जिकडे तिकडे
     खूप तापते जमीन तिजवर जागोजागी पडती तडे
गुपचिप झाली सर्व पाखरे - - - - - - - -
     - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

वारे सुटले मेघ उसळले गडगडती ते आभाळी
     वीज कडकडे लखलख करुनी सरसरसर वर्षा आली
सुटे मातीचा वास चहूकडे हिरवेहिरवेगार दिसे
     कागदहोड्या सोडायाची तळ्यांत आता मौज असे.

शरद येई अन मेघ पळाले गुबगुबीत जणू पळती ससे
     कुरणे हिरवीगार चहुंकडे, हिरवे हिरवे मळे तसे.(?) 

हिरवी झाडे, हिरवी शेते, तुडुंब भरले तळे निळे.(?) 

     चांदण्यात वाटे बागडावे (?)  - - - - - - - - - -

हेमंताचे दिवस पातले भरे हुडहुडी अंगात
     शेतक-याची गोफण फिरते गरगर भरल्या शेतांत
हवेहवेसे ऊन वाटते, (?) - - - - - - - - - -
     शेकोटीच्या भवती रात्री गप्पांना भरती येते

उदासवाणा शिशीर ऋतु ये पाने पिवळी पडतात
     सोसाट्याच्या वाऱ्यासंगे झर झर झर झर झरतात. 
झडून पाने झाडे सगळी केविलवाणी दिसतात
     दिसे तयांच्या बुंध्यापाशी पिकल्या पानांची रास

सहा ऋतूंचे चक्र फिरतसे शिशीर ऋतुही जाईल हा
     वसंत सांगे हळूच मीही येतो मागोमाग पहा

(?) suggested by Jyoti Vasagadekar Manohar 
1 comment:

 1. सहा ऋतू

  झुळझुळ वारे वाहु लागले,
  लाल पालवी तरूंवरी.
  फळाफुलांनी लवल्या वेली,
  आंबेराई मोहरली.
  आभाळाचे निळेनिळेपण,
  कुहू कुहू कोकीळा करी.
  आनंदी आनंद गड्यांनो
  वसंत आला घरोघरी !

  ग्रीष्मपातला, सूर्य तापला,
  ऊन कडक जिकडे तिकडे.
  खूप तापते जमीन, तिजवर
  जागोजागी पडती तडे.

  वारे सुटले, मेघ उसळले,
  गडगडती ते आभाळी !
  वीज कडकडे लखलख करूनी,
  सर सर सर वर्षा आली.
  सुटे मातीचा वास चहुंकडे,
  कागद-होड्या सोडायाची
  पावसात किती मौज असे !

  शरद येई, अन् मेघ पळाले
  गुबगुबीत जणु पळति ससे !
  कुरणे हिरवीगार चहुंकडे,
  हिरवे हिरवे मळे तसे.
  हिरवी झाडे, हिरवी शेते,
  तुडुंब भरले तळे निळे.
  चांदण्यात अन बागडण्याची
  हौस सारखी मनी उसळे
  हेमंताचे दिवस पातले,
  भरे हुडहुडी अंगात.
  शेतकऱ्याची गोफण फिरते
  गरगर भरल्या शेतात.
  हवेहवेसे ऊन वाटते,
  अंगणात आजी बसते
  शेकोटीच्या भवती रात्री
  गप्पांना भरती येते !
  उदासवाणा शिशिर ऋतू ये,
  पाने पिवळी पडतात.
  सोसाट्याच्या वाऱ्यासंगे
  झर झर झर झर गळतात
  झडून पाने झाडे सगळी
  केविलवाणी दिसतात.

  सहा ऋतूंचे चाक फिरतसे,
  शिशिर ऋतूही जाईल हां
  वसंत सांगे ‘मीही येतो
  हळूच मागोमाग पाहा !

  ReplyDelete