डायरी दि 27-28-29 जानेवारी ( डायरीबरहुकूम)
प्रश्न १७
प्रश्न १७ सध्या खाण्यापिण्याच्या खूप गोष्टी पॅकेटबंद मिळतात. त्यांच्या सोई- गैरसोई गुण- दोष काय ?
बरोबर ! माणसाला खूपदा तयार पदार्थांची गरज असते कारण पदार्थ तयार करत बसायला वेळ नसतो. आपण पोहे, भाजलेले चणे, दाणे, पापड, खाकरा, चकली असे पदार्थ तयार खाद्य म्हणून वापरतो
पण जस जस लोकांचा जीवन गतिमान होउ लागल तस तस त्याला तयार वस्तुंची गरज वाढू लागली. मग तयार लोणची, तयार साॅस, तयार मसाले, तयार नूडल्स, तयार पिझ्झा, तयार जूस- जॅम- जेली, अशा गरजा वाढत गेल्या. त्या बनवणा-या कंपन्या अस्तित्वात आल्या. मग एक प्रश्न निर्माण झाला तो म्हणजे ब्रॅण्डचा.
समज एक कंपनी आस्वाद या नावाने नुडल्स करत आहे. त्यांचे २०० ग्रॅमचे पाकिट आहे. मी ते घरी जाउन कापणार व उकळत्या पाण्यात सोडून दोन मिनिटांत माझा नाश्ता तयार करणार . पण त्याची चव कशी असेल ? मी चार दिवसांपूर्वीजे पाकिट आणल होत तशीच चव आजही असेल का? किंवा मी दुस-या शहरात जाउन तिथेही आस्वाद नूडल्स पाकिट घेतली तरी त्याचीही चव तशीच असेल का?
तर चव तशीच असल्याची गॅरंटी असेल तर एक फायदा होतो- मी ती वस्तू विकत घेत असताना मला तिच्याबद्दल थोडी कल्पना किंवा थोडी खात्री असते. यालाच स्टेंण्डर्डाझेशन असे म्हणतात. ते टिकवण्यासाठी उत्पादक कंपनीला प्रयत्न करावे लागतात. दरवेळी चव सारखीच ठेवण्यासाठी त्या पदार्थात प्रत्येक गोष्ट एका ठरावीक प्रमाणातच टाकावी लागणार. अशा प्रकारे त्या पदार्थांचा एक फॉर्म्यूला तयार झाला. तो फॉर्म्यूला इतरांना कळू द्दाायचा नाही- गुप्त ठेवायचा याचीही काळजी घ्यावी लागते. यासाठी कंपनीच्या नावाचे रजिस्ट्रेशन, लोगो, ब्रँण्ड, आणि फॉर्म्युल्याची हक्कनोंदणी असे कायदेशीर उपाय करतात.
पण अशा स्टेंण्डर्डाझेशन एक तोटाही असतो. कधीही खा, तीच चव. याचा कंटाळा येऊ लागतो. सुरवातीला छान चविष्ट वाटणारा पदार्थ त्याच त्या चवीमुळे नकोसा होतो. चेन होटेलमधेही हाच प्रकार होतो.
यावर उपाय असा कि एकच पदार्थ बनवणाऱ्या पण गावागावांचे वैशिष्टे जपणाऱ्या अशा वेगवेगळ्या कंपन्या असतील तर हा कंटाळा कमी होऊ शकतो. पण अशी गावा-गावांचे वैशिष्टेय सांगणारे खाद्य पदार्थ निर्माण करण्याचे तंत्र अजून आपल्या कडे मोठ्या प्रमाणावर नाही.
मात्र एकाद्या फूड फेस्टीवल मध्ये आपल्याला गावोगावचे विविध प्रकार चाखायला मिळू शकतात उदा, कोल्हापूरी, खान्देशी, मालवणी, गोवन, पंजाबी वगैरे. जसा हा कंटाळा खाद्यपदार्थांच्या बाबतीत होऊ शकतो तसाच तो इतरही बाबतीत होउ शकतो. उदा एकच धर्तीचे कपडे किंवा एकच प्रकारची ग्रीटींग कार्ड्स. थोडक्यात स्टेंण्डर्डायझेशनचे खूप फायदे आहेत. मात्र त्यांचा कंटाळा हा मोठा धोक्याचा तोटा आहे.
No comments:
Post a Comment