मराठीसाठी वेळ काढा

मराठीसाठी वेळ काढा

मराठीत टंकनासाठी इन्स्क्रिप्ट की-बोर्ड शिका -- तो शाळेतल्या पहिलीच्या पहिल्या धड्याइतकाच (म्हणजे अआइई, कखगघचछजझ....या पद्धतीचा ) सोपा आहे. मग तुमच्या घरी कामाला येणारे, शाळेत आठवीच्या पुढे न जाउ शकलेले सर्व, इंग्लिशशिवायच तुमच्याकडून पाच मिनिटांत संगणक-टंकन शिकतील. त्यांचे आशिर्वाद मिळवा.

Monday, October 10, 2016

घडीपत्रक सप्टें ९६ उद्देश व जाने ९७

GHADI PATRAK -- from settlement Commissioner-2


2 सापडली -- सप्टें 96 व जाने 97 -- चित्रफीत

सप्टेंबर १९९६
फोल्डर प्रकाशीत करण्याचा उद्देश




जमीन बाबीची अद्ययावतव अचूक माहिती ठेवण्याचे महत्वपूर्ण काम भूमि अभिलेख विभागामार्फत केले जाते.ब्रिटिश अमदानीमध्ये शंखु व साखली यांचे सहाय्याने केले जाणारे मोजणी काम त्यानंतर प्लेन टेबलने केले जाऊ लागले. आता दुर्बिण मोजणी करण्यासाठी अत्याधुनिक डिजिटल दुर्बीण यंत्र आपल्याकडे आहे. राज्यातील जिल्ह्याच्या ठिकाणी सर्व कार्यालयांमधे झेरॉक्स मशीन बसविल्या असून लवकरच त्यांचा उपयोग शासकीय कामाशिवाय अर्जदाराना नकला देणेसाठी करता येईल. भूमि अभिलेखांचे संगणकोकरण करण्याचे कामही वेगाने चालु असून त्याचा फायदा निश्चितच जनतेला त्यांची कामे लवकर होण्यासाठी होईल. एकंदर पाहता भूमि अभिलेख विभागामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर स्थित्यंतर चालु आहे. या वेगाने घडणा-या बदलांची व आधुनिक तंत्राची माहिती खात्यातील सर्वांना असणे अगत्याचे आहे.
जमाबंदी आयुक्त, पुणे कार्याल्यांतून आपले कार्याल्यांना सूचना, माहिती देण्यासाठी वेळोवेळी पारिपत्रके काढली जातात. यापुढे अशी परिपत्रके या फोल्डरच्या स्वरूपातून आपल्याकडे पोचविण्याचा मानस आहे. फोल्डर मध्ये दरमहा येणा-या माहितीमुळे आपल्याला प्रशिक्षण मिळून आपल्या दैनंदिन कार्यालयीन कामाची कार्यक्षमता वाढावी हा महत्वाचा उद्देश या फोल्डर प्रकाशनाचे मागे आहे. त्यामुळे विलंब टाळा कार्यक्षम व्हा हे ब्रीदवाक्य म्हणून फोल्डरसाठी निवडण्यात आले आहे. या ब्रीदवाक्यामुळे आपले स्वतःचे कार्यक्षमतेमध्ये वाढ व्हावी या अपेक्षेसह हा प्रथम अंक प्रकाशित करण्यात येत आहे. आपापल्या कार्यालयांना विलंब टाळण्यासाठी व जनतेला सहकार्य देण्यासाठी आपण काय काय त्याची नोंद वरिष्ठांमार्फत आमच्याकडे पाठवावी.
जमाबंदी आयुक्त आणि संचालक
भूमि अभिलेख (.रा.) पुणे
बंगला क्र. , शास्त्रीनगर, येरवाडा, पुणे- ४११००६
फोन: ६८९५१३/






दक्षता रोध



टिप: *सदरची फेर वेतन निश्र्चिती प्रकरणे, वर्ग- २ व वर्ग ३ मिळून असून त्यात दक्षतारोध बाबत फेर निर्णय जमाबंदी आयुक्त , पुणे व उपसंचालक भूमिलेख यांचे स्तरावरून होणार आहे.
     जमाबंदी आयुक्त , पुणे कार्यालयातील दक्षतारोध प्रकरणांचा जलद गतीने व परिणामकारक निपटारा होणेसाठी व 
अचूक, निःपक्षपाती व नियमानुसार निर्णय होणेसाठी दक्षतारोध समिती स्थापन करण्यात आली आहे. त्या समितीचे तिनही जमाबंदी उप आयुक्त सदस्य आहेत. सदर समितीची सभा दर तीन महिन्यातून एकदा घेण्यात येते व समितीचे सदस्य बैठकीच्या वेळी दक्षतारोध प्रकरणांचा आढावा घेतात. व प्रत्येक प्रकरण नियमांतर्गत तपासून, (एकमताने मान्यतेसाठी शिफारस, एकमताने नाकारण्यासाठी शिफारस किंवा एकमताने काठावरचे प्रकरण असा शेरा देतात) तद्नंतर जमाबंदी आयुक्त , पुणे प्रत्येक प्रकरण नियमांतर्गत तपासून व समितीच्या सदस्यांनी दिलेल्या अभिप्रायांचा विचार करून प्रकरणी अंतिम निर्णय घेतात. या पध्दतीमुळे आठ महिन्यात १३२ दक्षतारोध प्रकरणी निर्णय घेता आला आहे. अद्यापही निर्णय होणेवर १६२ प्रकरणे आहेत. या शिवाय वर्ग- ३ मधील काही दक्षतारोध प्रकरणे उपसंचालक भूमि अभिलेख/ अधिक्षक भूमि अभिलेख यांचेकडे शिल्लक आहेत. या विभागाकडे शिल्लक असलेल्या सर्व दक्षतारोध 
प्रकरणांचानिपटारा पुढील तीन महिन्यात करण्याचा प्रयत्न आहे. तसेच वर्ग-३ व वर्ग-४ चे दक्षतारोधबाबततत्सम पध्दत उ.सं.भू.अ. व अ.भू. अ. यांनी वापरणेची आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
“विलंब टाळा - कार्यक्षम व्हा”
प्रति,
----------------
----------------
----------------
-----------------

पीन


महत्वाचे क्रमांक: प्रशासन ३१२/-/९६.
पुणे, दिनांक    //१९९६

विषय:- नियंत्रण नोंदवही ठेवणे बाबत.....

परिपत्रक

आमच्या असे निर्दशनास आले आहे की, सर्व कार्यालयीन प्रमुख, नियंत्रण अधिकारी , विभाग प्रमुख यांनी त्यांचे अधिनस्त कार्यालयांवर नियंत्रण ठेवणेसाठी कोणतीही प्रभावी पध्दत प्रचलित नाही. सर्व कार्यालयांमध्ये विविध बाबींसाठी वेगवेगळ्या नोंद वह्या ठेवण्यात आलेल्या आहेत. परंतु सदर नोंदवह्यांची तपासणी दरमहा कार्यालय प्रमुख यांचेकडून केली जात नाही. तसेच नियंत्रण अधिकारी व विभाग प्रमुख यांना त्यांचे अधिनस्थ अधिका-यांनी सदरची तपासणी केल्याचे समजण्यासाठी कोणतीही पध्दत सध्या प्रचलित नाही. त्यामुळे अधिनस्थ कार्यालयाकडून महत्वाच्या संदर्भामध्ये झालेल्या कार्यवाहीची माहिती नियंत्रण अधिकारी यांना तपासता येऊ शकत नाही.



सर्व अधिका-यांची स्वतःच्या कामाची कार्यक्षमता वाढावी व त्यांचे अधिनस्थ कामावर सुय्योग्य नियंत्रण रहावे तसेच त्यांनी तपासणी केलेल्या बाबींची त्यांच्या वरिष्ठांना सुलभतेने दाखल घेता यावीया दुहेरी उद्देशाने प्रत्येक अधिका-याने यापुढे त्यांची नियंत्रण नोंदवही ठेवावीप्रत्येक अधिका-याचे काम थोडेफार वेगळे असल्याने प्रत्येकाची नियंत्रण नोंदवही थोडीफार वेगळी असेलप्रत्येक अधिका-याने त्याच्या कामाच्या दृष्टीने इतर सहकारी व वरिष्ठ अधिकारी यांचेशी चर्चा करुन आपआपल्या नियंत्रण नोंदवहीचा नमुना ठरवावा वरिष्ठ अधिकारी यांनी त्यांचे नियंत्रण नोंदवहीमध्ये त्यांचे अधिनस्थ असलेल्या कार्यालय प्रमुख यांच्या नियंत्रण नोंदवह्यांची नोंद घ्यावीनमुन्यासाठी जमाबंदी उपआयुक्त (.सापुणे यांची नियंत्रण नोंदवही या सोबत दिली आहेमात्र का४ यांचे नियंत्रण नोंदवहीमध्ये लोकआयुक्त संदर्भविधान सभा प्रश्नशासनाकडे सादर केलेल्या प्रस्तावांची नोंदवही इंनांवे आहेतयावरून ज..आणि क.यांचे नियंत्रण नोंदवहीमधील वेगळेपणा समजून येईल.

जमाबंदी उप आयुक्त(सर्वसाधारण) पुणे यांची नियंत्रण नोंदवही.
..तपासणी करावयाच्या
रजिस्टरचे नाव व
संख्या
जाने फेब्रु मार्चएप्रिल मे
१९९६ १९९६ १९९६ १९९६ १९९६

जून जुलै ऑगस्ट सप्टें
१९९६ १९९५ १९९६ १९९६
ऑक्टों
१९९६

नोव्हे डिसें
१९९६ १९९६
शेरा
. कार्यालय अधिक्षक अ-१ यांची नियंत्रण नोंदवही

. कार्यालय अधिक्षक ‘अ-२’ यांची नियंत्रण नोंदवही
. कार्यालय अधिक्षय ‘अ-३’ यांची नियंत्रण नोंदवही

. कार्यालय
अधिक्षक
-२ यांची
नियंत्रण
नोंदवही

. कार्यालय अधिक्षक इ-३ यांची नियंत्रण नोंदवही

. कार्यालय अधिक्षक इ-४ यांची नियंत्रण नोंदवही

. कार्यालय
अधिक्षक इ-५ यांची नियंत्रण नोंदवही

. कार्यालय अधिक्षक इ-६ यांची नियंत्रण नोंदवही
पहिले- पहिले
स्वा xx स्वा xx
२७..९६ ३०..९६







..आ ज..
तपासले
स्वा xx








..
पाहिले *
१७..९६
..








.. २७ ते ३० नोंदवह्या
अद्यायावत आणाव्यात स्वाxx
२७..९६ ०
...






पाहिले
२७..९६
स्वा xx
पाहिले
२७..९६
स्वा xx

























पाहिले तपासले
*श्री. पांडे/
देगांवकर
यांचे
कडील नोंदवह्या
अद्ययावत
आणून दाखवा
स्वा xxx
..











० अ.शा..
रजिस्टर
गोषवा-यासह
अद्ययावत आणावे, अगावू वेतनवाद नोंदवही अद्ययावत आणून दाखवावी.
स्वा xx
...







































.नं. १४, १५, १६ व १७ ची रजिस्टर्स


आपल्या कार्यालयातील सर्व नोंदवह्यांची दरमहा ज्या त्या अधिका-याने स्वतःच्या सोईने वेळच्या वेळी तपासणी करावी असे अपेक्षित आहे. सदरहू नोंदवह्या तपासताना साप्ताहिक गोषवारे काढले आहेत काय? शिल्लकी प्रकरणांचा तपशील कालावधी नुसार दिला आहे काय? शिल्लक संदर्भाचे अनुक्रमांक नमुद केलेआहेत काय? इत्यादि गोष्टींची खात्री करावी. अशा प्रकारे तपासलेल्या नोंदवहीबाबत नियंत्रण नोंदवहीतयोग्य तो शेरा ठेवावा. (नमुना पहावा)
उपरोक्त नियंत्रण नोंदवहीमुळे लोक आयुक्त संदर्भ, शासन संदर्भ, विधान सभा प्रश्न, विधान परिषद/विधान सभा सदस्यसंदर्भ इत्यादी महत्वाचे संदर्भ वेळेत निकाली केले जातात किंवा नाही याची माहिती होईल. तसेच शिल्लक प्रकरणांची दखल दर महिन्याला अधिकारी स्वतःघेतील यामुळे निपटारा करणेसाठी संबंधित अधिका-यांना निश्चित असा कार्यक्रम ठरविणे व त्यानुसार कार्यवाही करणे शक्य होईल. तसेच नियंत्रण नोंदवहीमुळे इतर सर्व नोंदवह्या अद्ययावत राहतील. वरिष्ठ कार्यालयांकडून उपरोक्त संदर्भाचे प्रगतीचा, प्रलंबिततेचा अहवाल वारंवार अधिनस्थ कार्यालयांकडून मागणी केला जातो, त्यावेळी संबंधित नोंदवह्या अद्ययावत राहिल्यामुळे माहिती काढणे सोपे होईलतालुका निरीक्षक भूमि अभिलेख यांचे नियंत्रण नोंदवहीमध्ये त्यांचे कार्यालयातील इतर सर्व नोंदवह्यांची नोंद करावी.
कार्यालयातील ज्या-त्या नोंदवह्या अवलोकन केल्यावर संबंधित अधिका-याने नियंत्रण नोंदवही मध्ये. पाहिले” , सखोल तपासले” , “वर वर पाहिले” याप्रमाणे शेरे नमुद करुन दिनांकित स्वाक्षरी करावी. नियंत्रण नोंदवही वरिष्ठ अधिका-यांच्या अवलोकनासाठी वेळच्या वेळी सादर करावी.
या नियंत्रण नोंदवहीमुळे ज्या त्या अधिका-याला स्वतःच्या कामाचा उठाव करता यावा ही अपेक्षा आहे, त्या प्रमाणे उठाव होऊ शकला की नाही याचा आढावा सर्व वरिष्ठ अधिका-यांनी दर महिन्याच्या मिटिंगला घ्यावा.
------------------------------------------------------------------



Tuesday, November 10, 2015

बालपणातील धरणगांव - जडणघडण दिवाळी २०१५ अंक

जडणघडण दिवाळी अंकासाठी
jadanghadan@gmail.com


लेख --

बालपणातील धरणगांव

ते घर आता आमचे नाहीआता ते छोटू पाटीलने विकत घेतले आहेत्याची आई आणि आजी निमंत्रण देऊन गेलेल्या आहेत -- ताईएकदा घरी येऊन जा घर अजूनही तुमचच आहेमी खूपदा माझ्या जळगांव दौऱ्यांमधे धरणगांवला जाण्याचा वेळ काढते असेचिंतामण मोरयातहसील कचेरीबस स्टॅण्ड -- पण घरी जात नव्हतेपुढची किती काम राहिलीत अस मनाला बजावूनआज तरी घरी जाण्याचा मोह सोड असा धाक देऊनमी दुसरीकडे वळत होते.

मग एक दिवस ठरवून वेळ काढलाछोटूला आधीपासून सांगाचयी कांय गरज असं म्हणत कुणालाच सांगितले नाहीभाईसाहेबांच्या (काकांच्यामुलांपैकी तेंव्हा फक्त शशीच धरणगांवला रहायचापण त्यानेही आता चिंतामण मोरया जवळ नवं घर बांधलेल होतंतिकडेच रहायचाआयत्या वेळी वाटल तर त्याला सांगायचनाही तर एकटच जायचं असं ठरवून टाकलं.

मोरयाच दर्शन घेऊन रिवाजा प्रमाणे त्या ओट्यावर पाच मिनिटं बसले - - शशी आणि मीरा नेमके आजच बाहेरगांवी गेले होतेआता उठून ड्रायव्हरला सांगायच तिकडे गांवात चलायचय बर आज !

आणि मनांत प्रचंड उलथापालथ झालीअस वाटल की आता घरी जाऊनसर्व घर पुन्हा एकदा नजरेत भरून घेतल्यासारख होणार नाही – ते निव्वळ पुढील काही काळासाठी शिदोरी म्हणून असणार नाहीआज घरी गेले तर परत निघतांना बहुतेक जुन्या सर्व आठवणी त्याच्या उंबरठयापाशी ठेऊनरिक्त होऊन परतेनते दर्शन “पुनरागमनायच” असणार नाहीत्या भेटीनंतर घराशी असलेले भावनिक संबंध संपतीलआठवणी कायम रहातील पण त्रयस्थाप्रमाणेफक्त वस्तुस्थितीदर्शकतो अखेरचा निरोप ठरेल.
मग मी घरी गेलेच नाहीमोरयावरूनच जळगांव गाठलं आणि रात्रीच्या गाडीने मुंबई म्हणून ते घर अजूनही माझंच आहे एक भेट होईपर्यंत तरी नक्कीच!
-------------------------------------------------------------------------------------

खूप जणांना बालपणातल्या अगदी लहान वयातल्या गोष्टी आठवतातमला तेवढया नाही आठवतआई सांगते माझ्या वयाच्या दोन वर्षापर्यंत आम्ही लोणावळ्याला होतो कैवल्यधाम इन्स्टिट्यूटमधे दादा (वडीलनोकरी करतपण त्यांना डॉक्टरेट मिळाली आणि इन्स्टिट्यूटने आता तुम्ही जास्त चांगली नोकरी बघा असा निरोप दिला.

मग आम्हीं धरणगांवी आजोबांकडे (नानांकडेरहायला आलोदादांनी अनुक्रमे खांडवा (मध्य प्रदेश), व्यारा (गुजरातआणि जबलपुरला नोक-या धरल्या असे वयाच्या सातव्या वर्षी मी जबलपुरला आलेतोपर्यंतचा बराच काळ धरणगांवी नानांकडे गेला.

व्यारा येथील घराला मातीच्या भिंती आणि मातीची जमीन होती आणि आई त्यांना बाईकडून शेणाने सारवून घ्यायची हे मला आठवतंत्या तुलनेत धरणगांवला नानांच्या घरांत सर्वत्र फरशी होती फक्त स्वैंपाकघर आणि मडक्याची खोली सोडूनघर उत्तर दक्षिण असं होतं एल या अक्षराच्या आडव्या रेघेसारखंआणि उभ्या रेघेच्या जागी नानांचे धाकटे भाऊ अप्पा यांच घर होतंत्यांच्याकडील बहुतेक खोल्या मातीच्या होत्यामोठ्या चुलत बहिणी सगळी जमीन शेणाने सारवतलांब हात करून छान वर्तुळाकार आणि विविध नक्षींचे ते सारवणे असायचेत्या नक्षी आणि तो वास मला खूप आवडायचाचुलत बहिणींमुळे मला सडा घालणेशेणाने सारवणेयेऊ लागले आणि रांगोळीची कलापणम्हणूनच आजही शेणमातीचिखल हे मला कचरा वाटतच नाहीतउलट व्यवस्थित न वापरलेल्या प्लॅस्टिकचा मात्र खूप कचरा होतो.

माझा आजी वडिलांच्या लहानपणीच वारली होतीदादांच्या काकूलाच सर्व मोठी आई म्हणतखानदेशांत अशी नात्यांची जवळीक फारदूरच्या भावाच्या मामाला देखील सर्व मामाच म्हणणारमाझी आई कोकणस्थ आहेतिला फार पेच पडायचा नाती समजून घ्यायलानात्यांच्या या प्रकारामुळे मोठ्या आईच्या माहेरचेमाझ्या काकूंच्या माहेरचे आणि आईच्याही माहेरचे असे सगळेच मामा मावश्या होत असतत्यांत माझा कधी गोंधळ नाही झाला.

आसपासच्या मिळून एकूण सात घरांना अग्निहोत्री वाडा असे नांव होतेमात्र त्यापैकी एक घर पाटील यांचे व दुसरे एक सुतार यांचे होतेअप्पा आणि पाटीलांच्या कडील गायबैलबकरी वगैरे सामाईक अंगणातच बांधली जातत्यामुळे धारोष्ण दूधसडा-सारवणासाठी हवे तेवढे शेणगुरांची सोबत या गोष्टी रोजच्यातल्या होत्यापाटीलांचा कुत्रा वाघ्या आमचाही लाडका होतात्यांच्या घरी पूर्ण शाकाहार असेमहिन्या-दोन महिन्यातून आमची फेरी त्यांच्या शेतावर होईभुईमूगकापूसहरभराज्वारी ही पिकं नित्य परिचयाची झालेलीज्वारीच्या तोट्यांपासून बैलगाडीसकट निरनिराळी खेळणी आम्ही करत असूशिवाय पत्रावळीद्रोण  बनवणंबुरुड गल्लीत ते लोक दोऱ्या कसे वळतातझाडणीसूपटोपल्या कसे बनवतात हे ही पहायला मोठ्यांपैकी कुणीतरी घेऊन जातरोज गुराखी येऊन गाईंना चरायला नेत आणि संध्याकाळी घरी आणून सोडतगावातील कामे सामाइकरीत्या कशी चालत त्याचा तो नमूना होता.

दादांच्या पडत्या काळातच आईने नागपूरच्या SNDT कॉलेजमधील सोईचा फायदा घेअन बाहेरून बीए करायचं ठरललग्नावेळी ती मॅट्रिक झालेली होती.पण तिला शिकायची इच्छा होतीया बाबतीत नानांचाही फार कटाक्ष होता -- तू हुशार आहेस तेंव्हा शिक्षण पुढे ने असे कायम प्रोत्साहन होतेबीए साठी चार वर्ष लागणार होतीपरिक्षेपुरती दोन महीने नागपूरला होस्टेल मधे राहून अभ्यास करण्याची सोय होतीत्या काळांत मी नानांकडेच असायचीएका आतेचे दोन मुलगे शिक्षणाला त्यांच्या कडेच रहातअधून मधून दुस-या आतेचा मुलगा पण येईएकत्र कुटुंब-पद्धतीचा हा फायदा मी अनुभवला कि सोय असेल तिथे इतर कित्येक जण येऊन आपापला मार्ग प्रशस्त करून घेऊ शकत होतेत्याचवेळी माधुकरी हा प्रकारही मी जवळून पाहिलानाना आणि अप्पा मिळून चार-पाच मुलांची माधुकरीची जबाबदारी उचलतघरात शिजलेल्या स्वयंपाकातून पहिला त्यांचा वाटा बाजूला काढून ठेवतआर्थिक परिस्थितीमिळे कुणाचे शिक्षण मागे राहू नये यासाठी केवढी मोठी सामाजिक जबाबदारी प्रत्येक कुटुंब पार पाडत असे!

काकांच्या घरात माझ्यापेक्षा मोठी माझी चार चुलत भावंडं होतीत्यामुळे माझा सर्व वेळ धुडगुस घालण्यातच जाईमला शाळेत घालायची घाई कुणालाच नव्हतीमात्र आईने मला अक्षर-ओळखपाढेलिहायला वाचायला आवर्जून शिकवलेतर नानांचा सपाटा असायचा सर्व पोरासोरांना तोंडी गणितं घालण्याचाइतर मोठया भावडांना गांगरायला होत असतानाच मी मात्र पटापट तोंडी गणितं सोडवत असेत्यामुळे मी नानांची लाडकी नात होतेत्यांनी मला अगदी लहान वयांत भूमिती पण शिकवली होती .

धरणागांव हे त्या पंचक्रोशीतील मोठं गांवते व्यापाराच ठिकाण होतगांवाला म्युनिसिपाल्टी होती आणि बरेच रस्ते सीमेंट कांक्रीटंचे होतेफरशांनी व्यवस्थित बांधून काढलेला मोठा बाजार होता त्याला कोट म्हणतलांब गिरणा नदीवर धरण बांघलेलं होतगांवात पोस्ट ऑफिसतार ऑफिस आणि हायस्कुल होतशिवाय भुसावळ सूरत लाईन वर धावणारी एक्सप्रेस गाडी देखील धरणगांवी थांबायची इतकं ते मोठं होतंते गाव होत पण खेडं नव्हतं -- तरी पण गांवाला पिण्याच्या पाण्याची पर्मनंट सोय नाही म्हणून ब्रिटिशांनी तालुका ठिकाणासाठी एरंडोल या तुलनेने अत्यंत लहान गांवाची निवड केली होतीयाची खंत सर्व गांवकरी बाळगून होतेअगदी अलीकडे म्हणजे सन् 2000 च्या आसपास धरणगांव हा वेगळा तालुका करण्यांत येऊन धरणगांवी मामलेदार कचेरी आली तेंव्हा आता खंत संपली अस दादांनी बोलून दाखवलंधरणगांवच्या मानाने एरंडोल व इतर गांवे खूप छोटी वाटततिकडल्या नातेवाईकांकडे गेल्यावर मनोमन मला धरणगावात सिमेंटचे रस्तेहायस्कूल, रेलवे स्टेशनपोस्ट-तार ऑफिस असण्याचा अभिमान वाटायचापण पुढे जबलपुर आणि मुंबई पाहिल्यानंतर शहर-गांव-खेडं ही उतरंड मला समजू लागली.

धरणगांवी माझी मोठया चुलत बहिणींबरोबर संध्याकाळी फिरायला जायची ठिकाणं म्हणजे राममंदिरविट्ठल मंदिर हे रोजचेशिवाय कधी लांब जायचे ठरले तर बालाजीनानांचे मंदिर किंवा उलटया दिशेला चिंतामण मोरया बालाजी नानांचे मंदिरही विट्ठलाचेच होते पण त्यांच्या मागच्या अंगणात एक मोठा रथ अणि कृष्ण व पाचही पांडवांच्या पूर्णाकृती मातीच्या मूर्ती होत्यादस-याला त्या रथांत पांडवांना बसवून रथयात्रा निघायची. मधे दंगलींमुळे खूप वर्ष ही प्रथा बंद पडली पण आता नुकतीच पुन्हा सुरू झाली आहे. बालाजी मंदिरात जाण्याच मुख्य आकर्षण ते रथ आणि मूर्ती हेच होतेया शिवाय चुलत भावा-बहिणींबरोबर कोटावर बाजाराला जाणेपोस्टात जाणेदळण आणायला गिरणीवर जाणे हे कमी प्रतीचे उद्योगही होतेमोठा उद्योग होता तो म्हणजे दुकानावर जाण्याचा.

नाना पंचक्रोशीत हुषार म्हणून नांवाजले होतेत्यांच्या काळांत म्हणजे 1890 च्या आसपास कधीतरी ते व्हर्नाक्युलर फायनल (म्हणजे सातवीही त्या काळातली मानाची परीक्षा पास होऊन शाळेत गणिताचे शिक्षक म्हणून नोकरीला लागले होतेपण स्वतःपुरती नोकरी न करता संपूर्ण कुटुंबासाठी असेल असे कांही तरी कर असे त्यांच्या वडिलांनी सांगितल्यावरून त्यांनी शाळेची नोकरी सोडली आणि गांवाच्या अगदी एका टोकाला लाकडाचे दुकान काढलेत्यांचे पाहून कांही मुसलमान मंडळींनी देखील त्याच परिसरांत लाकडाची दुकानेसॉ-मिल इत्यादी काढल्यात्या आठदहा मुसलमान कुटुंबांच्या बरोबर नानांचा चांगला घरोबा होतादुकानावर अर्थातच धाकट्या भावाला पण घेतलेदुकानाचे सामान निवडण्यासाठी नाना गुजरातच कांय तर पार कलकत्त्यापर्यंत जाऊन आलेले होते ते मराठी खेरीज गुजरातीआहिराणी पण छान बोलतआजी लौकर वारली पण स्वतःच्या चारही मुलांचा सांभाळ त्यांनीच केलात्यांना कीर्तनाचा छंद होतागांवात विणकर समाज (साळी समाजखूप मोठा होताहातमागावरच लुगडीधोतरं आणि सतरंज्या उत्तम प्रतीच्या तयार होत असतअशा त्या साळी समाजान नाना व बालाजी नाना मिळून कीर्तन करीत असतहा साळी समाजही बहुतांशी शाकाहारी होताखूप पुढे बिहारमधे गेल्यावर तिथे या तुलनेने मांसाहार जास्तच दिसायचाधरणगांवी केवढा मोठा समाज शाकाहारी होता. या शाकाहाराच्या सर्व कारणांमधे महाराष्ट्रातील पंढरपुर वारी हे ही एक कारण होते हे मोठेपणी जाणवलेसाळी समाजात पूर्ण श्रावणभर नाना आणि बालाजीनाना कीर्तन करीतनाना वारल्यानंतर ती जबाबदारी दादांनी उचलली आणि दर उन्हाळ्याच्या सुट्टीत साळी समाजासाठी महिनाभर ज्ञानेश्वरीचे विवेचन करीत ते थेट १९९९ पर्यंतकीर्तनेपारायणेभागवत-पाठदेवीचा जागर इत्यादि सामूहिक कार्यक्रमांनी सबंध भारतभर समाजातील मूल्ये टिकवून ठेवलीपण आता आधुनिकतेच्या नावाखाली आपण ती समाजमूल्य आणि ते कार्यक्रम या दोघांना हरवत चाललो आहोत असे वाटते.

आमच घर तसं बरच मोठघराच्या पश्चिमेला रस्ता होतात्या बाजूच्या खोल्या बहुधा अडगळीचे सामान ठेवण्यासाठी वापरतमात्र उन्हाळयांत तिथे अंबांच्या राशी येऊन पडत आणी गवताच्या गंजीत ते आंबे झाकून ठेवले जात पिकण्यासाठीत्या मोसमांत माझा आवडता उद्योग असायचा गंजीतून पिकलेले आंबे शोधून खाणंही परवानगी फक्त मला होतीआते-भावांनाचुलतभावांना नव्हतीत्यामुळे मी लहानपणी मनसोक्त आंबे खाल्लेले आहेत -- ते सुद्धा विविध जातींचेघरांत रोज आमरस-पोळीचे जेवण असेपण मला आंब्याचा रस खाणे तोही दूध-तूप-साखर इत्यादी घालून खाणे हा प्रकार कधीच आवडला नाहीकदाचित म्हणूनही मला हवे तेवढे आंबे खायला परवानगी होतीत्या आंब्यांमधे शापू आंबे हा ही एक प्रकार असेम्हणजे काही आंब्यांच्या झाडांवर कुठून तरी शापूचे गुणजनुक चिकटतात आणि त्या झाडाच्या आंब्यांना शापूची वास येऊ लागतोखूप जणांना हा वास आवडत नाहीमला मात्र आवडत असेत्याकाळी आमच्याकडे नित्यनेमाने आंबे विकणारी भागाबाई येत असेतिने भरलेले आंबे कधी शापू असले तर हमखास गिऱ्हाइक कोण हे तिला माहीत असेखूप नंतर मला श्री रणदिवे या आंबातज्ज्ञांनी सांगितले कि शापूची चव हमखास आंब्यात उतरेल असे प्रयोग त्यांना करायचे आहेत कारण त्यामुळे आंब्याची चव स्टॅण्डर्डाइज करता येईल आणि एक्सपोर्टसाठी ते अनुकूल ठरेलएकूण काय तर तऱ्हेतऱ्हेचे आंबे आवडीने खाणे हा मला धरणगांवने शिकवलेला गुणएरवी खूपजण हापूस शिवाय इतर आंबा खाऊच शकत नाहीत.

नानांची एक मजेदार आठवण आई सांगतेमाझा जन्म आमच्या घरांतच झालासकाळीच पोटात काही तरी वेगळ वाटतय म्हणून देवघराची मोठी खोली रिकामी करून तयार करून ठेवली होतीबाळंतपण करण्यासाठी माझी आत्या अणि सुईण होत्यादुपारी नाना जेवायल घरी आले तो पर्यंत माझा जन्म झालेलामुलगी झाली म्हणून जरा हिरमुसले होऊन ते लौकरच दुकानात परत गेलेसायंकाळी दोन तरुण मुले त्यांच्याकडे आलीकधीकाळी त्यांच्या वडिलांनी नानांकडून कर्ज घेतले होते आणि नानांनी त्याची आशा सोडून दिली होतीपण त्या शेतकऱ्याने मरतांना मुलांना सांगून ठेवले - ``अरेत्या सज्जन माणसाचे कर्ज वुडवू नका ``. म्हणून वडिलांचे सर्व कार्य पार पाडल्यावर सर्वात आधी ते दोघे भाऊ नानांकडे दोन हजार रूपये परत देण्यासाठी आले होतेमग नानांचा मूड एकदमच पालटलालगेच सोनाराकडून माझ्यासाठी गळ्यातली सोनसाखळी घेऊन व मिठाई घेऊन पहिली बेटीधनाची पेटी म्हणत घरी आलेगंमत म्हणजे माझ्या वाढदिवसाला पुष्कळदा असे घडते की कुठले तरी जुने येणेमग कधी ते अगदी किरकोळी असेल पण माझ्या वडिलांना मिळत राहिलेले आहेमी लाडकी नात असण्याच एक हे कारणही असेल.

माझ्या लहानपणी दुकानावर नानाअप्पा किंवा अप्पांची दोघं मुले भाईसाहेब काका आणि बाळकाका ही असतत्यांचा दुपारचा जेवणाचा डबा तयार करून घरून पाठवला जाई -तो बहुधा मी व चुलत भाऊ अनिल असे दोघे घेऊन जात असूदुपारच्या उन्हांत पाय भाजायचे म्हणून आम्हीं अगदी पळत जात असूत्या काळांत मुलांना चपला वगैरे चंगळ नसायचीजाता येता पोस्टात जाऊन टपालही आणत असू -- तिथले पोस्टमास्तर तार कशी करावी-- वजन कसे करावे इत्यादी दाखवत असततीच तऱ्हा रेलवे स्टेशनवरही होतीहा घरोबाही आता हरवत चालला आहेएव्हाना दुकानाची वाढ होऊन तिथे फरशी आणि इतरही सामान ठेवले जाऊ लागले होतेपुढे दादांना जबलपुरची बरी नोकरी मिळाल्यावर नानांनी दुकानाचे सर्व व्यवहार भावाच्या नावावर केलेपण आमचे दुकानावर येणे जाणे मात्र कायम राहिले.

नाना व अप्पांच्या दोन घरांच्या मधल्या जागेत सामाईक मोरी आणि मोठी विहिर होतीविहीरीवर तीन रहाट होतेएक आमच्या सामाईक मोरीतील होतादुसरा रहाट नानांच्या चुलत भावाचा होता आणि तिसरा सार्वजनिक -- गांवासाठी ठेवलेला होताहे पण मी शिकलेले एक मूल्यविहीर जरी नानांनी खणलेली होती तरी पाण्याचा एक भागात सर्व गावासाठी होतातिथे सकाळ संध्याकाळ गांवच्या सासुरवाशिणीमाहेरवाशिणींची बरीच गर्दी असाचयीआईकाकूसगळ्या आत्या यांची सगळ्यांशी ओळख आणि मैत्री असेमी पण लहान वयातच रहाटावर पाणी काढायला शिकलेशिवाय दुकानांत जाताना वाटेत एक मोट लागत असेतिथे थांबून पाणी काढणारे बैल पहाणे हा आमचा आवडता छंद होतापुढे माझ्या मुलांना आणि भाचरांना ते धरणगावी आल्यावर मी आणि आई आवर्जून हे सर्व उद्योग शिकवीत राहीलोत्यामुळे ग्रामीण आयुष्याचा थोडाफार लळा त्यांनाही लागलाच.

आमच्या घरून बाहेर पडले की लगेचच मोठा रस्ता येई तो पिठाची गिरणीपोस्ट ऑफिसहायस्कूल वरून बस स्टॅण्डवर जाईत्याच्या दुतर्फा इतर मोठी दुकानं होतीमग एक मोठा कमानीचा दरवाजा होता व त्या पलीकडे आठवडा बाजारासाठी विस्तृत मैदानकमानीवर सुभाषचंद्र बोसांचे मोठे चित्र होते व दरवाज्याचे नांवही सुभाष दरवाजा होतेशिवाय गांवात एक जुनी पडकी इमारत होती व ते घर म्हणजे झांशीच्या राणीचे आजोळ असं लोक सांगतखरं-खोट्याची पडताळणी अजून झालेली नाहीपण एवढं मात्र खरं की त्यामुळे झाशीची राणी व सुभाष हे माझे पहिले बालपणाचे हीरो होतेअसा समृद्ध वारसा असूनही आपण तो जपत नाही -- पुढील पिढीला शिकवतही नाही याची खंत वाटतेफक्त चारपाचशे वर्षांचा युरोपियन संस्कृतीचा इतिहासपण अगदी छोटीशी सांस्कृतिक विरासतही ते लोक जपून ठेवताततिच्या अवती-भोवती म्यूझियमस्मृती-वनग्रंथशाळाइत्यादि वास्तू उभारतात -- ते एक पर्यटन-केंद्र बनून गांवासाठी व्यवसाय पुरवते.

खानदेशांत त्या काळी धाव्याची घरे असायचीम्हणजे असे की घरांच्या भिंती बहुधा माती किंवा विटा-चुनांच्या असतत्यांच्यावर कांक्रीटचे छप्पर कसे चालणारपण इतरत्र असतात तसे कौलाचे छप्पर देखील नसेत्याऐवजी चटया व लाकडी वासे घालून त्यांच्यावर खारी मातीचे थर टाकीतखानदेशांत सर्वत्र तापी नदीच्या गाळांत येणारी माती ही चिकण माती किंवा खारी म्हणून ओळखली जातेतिचे थर टाकले की पाणी खाली झिरपत नाहीतर त्या मातीवरून वाहून जातेभिंतीच्या बरोबर वर एक फूट रुंद आणि एक-दीड फूट उंच अशी परोटी बांधली जायचीधाब्यामधेच मोठी चौकोनी जागा मोकळी सोडली असे त्यांना धारं म्हणतात त्यातून सूर्यप्रकाश खाली घरात जाईपाऊस आला की शिडीने धाब्यावर चढून सर्व धारी त्यांच्या पत्राच्या झाकणांनी बंद करण्यासाठी एकच धांदल उडेगांवातील बरीचशी धाबी एकमेकांना चिकटून असतत्यांच्या वरून कुठेही जाण्यास लहान मुलांना मज्जाव नव्हताखानदेशांत पर्जन्यमान खूप नाहीतसेच वर्षातील आठ महिने तरी कोरडेच त्यामुळे धाब्याची घरे हा सर्वांत स्वस्त पर्याय चालतोखारी टाकायची असेल तेंव्हा ज्या घरांत खारी येईल त्यांच्या आसपासची सर्वजण मिळून खारी उतरवून घेऊन ती धाब्यावर टाकत-- तुझे काम मी का करू हा भाव नसेहाच प्रकार उन्हाळ्यातील बायकांच्या बेगमीच्या कामाबाबतज्या घरी वर्षभरासाठी पापडशेवयाकुरडया करायचे असतील तिथून सकाळी-सकाळी निमंत्रण येईमग इतर बायकांनी आपापले पोळपाट-लाटणे वगैरे घेऊन त्या घरातील बायकांच्या मदतीला जायचेलहान मुलांना तर अशा वेळी खूप कामे असायचीशेवया हातावर पेलून वाळत घालणेपापड वाळत टाकणेलाटून देणे आणि मनमुराद लाट्या खाणेया सर्व प्रिझर्व्हेटिव्ह न घातलेल्यावेगवेगळ्या घराची वेगवेगळी चव असलेल्या साठवणींच्या पदार्थांची चव ही मला अजूनही पर्वणीच वाटतेही खाद्यसंस्कृतीही आपण विसरत चाललो आहोतखरे तर "" पापड-शेवया घालण्याचा सीझन """ असाही आपला एक पर्यटन-सीझन असू शकतो -- हल्ली हुरड्याचा सीझन झाला आहे तसाच.

जबलपुरनंतर दोनच वर्षांत दादांना बिहार सरकारच्या प्रथितयश मिथिला संस्कृत रिसर्च इन्स्टिट्यूट मधे प्रोफेसरशिप मिळालीत्याच वेळी नानांचे निधन झालेतोवर आम्हीं तिघे भावंडं होतोउन्हाळ्याची मोठी सुटी असायचीत्यांमुळे दरवर्षी सुटीत आम्ही धरणगावी येत असूइथल्या शाळेतही मी चुलत भावंडांसोबत जात असेत्यामुळे हे ही धडे पक्के होत असतअशाप्रकारे आम्हा तिघांना मराठी व हिंदी दोन्ही भाषा उत्तम येऊ लागल्यामुख्य म्हणजे वेगवेगळ्या प्रांतांची वेगळी संस्कृतिवेगळा इतिहास आणि तरीही सांस्कृतिक जवळीक मला दिसली आणि भावलीधरणगांवी आल्यावर धुळेअंमळनेरचालीसगांवचोपडा आदि ठिकाणी नातेवाईकांकडे फिरणे होईमनुदेवीपद्मालयउनपदेवचे गरम झरे आणि खुद्द धरणगांवचा चिंतामण मोरयाइथे नेहमी जाणेयेणे होईमुंबई आणि आईचे माहेर--कोकणातले देवरुख इथेही फेऱ्या होत असतशिक्षणानंतर मी भारतीय प्रशासन सेवेत आले व मला केडरही महाराष्ट्रच मिळालेत्यामुळे धरणगांवचे ऋणानुबंध कधी संपलेच नाहीतसंपूही नयेतमी एवढी मानाची परीक्षा उत्तीर्ण झाल्याची पहिली पावती लागलीच मिळालीत्या काळी मंत्री असलेल्या श्री मधुकरराव चौधरी यांनी थेट दरभंगा येथे दादांकडे अभिनंदनाची तार पाठवली.
मात्र इतक्या वर्षांमधे धरणगावात काही बदल निश्चितच झाले आहेतइथला विणकर समाज आपले कौशल्य व त्यातून मिळणारी उपजीविका दोन्ही हरवून बसला आहेविकेंद्रित एकॉनॉमीची जागा सेंट्रलाइज्ड एकॉनॉमीने घेतली आहेत्यामुळे भांडवली गुंतवणूकीसाठी मोठे आर्थिक पाठबळ असलेल्यांपुरता जिनिंगचा व्यवसाय वाढला आहेसुभाष दरवाजा कधीच मोडीत निघाला आणि आता इतर पुतळे असले तरी पुन्हा कोणी सुभाषचंद्र बोसांची आठवण ठेवलेली नाहीगावात हायस्कूल सोबत दोन कॉलेजेस आहेत पण बेरोजगारी आणि बकालपणाही खूप आलेला आहेरस्ते जसजसे खराब होत गेले तसतशी निगा राखलेली नाहीखानदेशातील जवळपास सगळ्याच गांवांची हीच स्थिती आहेतरीही खानदेशी मातीत एक प्रकारची जिद्दटिकाऊपणा आणि आदरातिथ्य आहेअसे मला वाटतेत्यामुळे अचानक या सुरवंटाचे फुलपाखरू होऊ शकते.

मला धरणगांवची एक आठवण आवर्जून नमूद करावीशी वाटतेकॉलेजात असताना सर्वांचे धरणगावी येण्याचे तिकिट काढलेले आणि माझी परीक्षा अचानक पुढे ढकलली गेलीएव्हाना मला रेलवेने एकटीने लांबचा प्रवास करण्याची सवय झालेली होती म्हणून बाकी सर्व मंडळी धरणगावी आलीमी मैत्रिणीकडे राहून परीक्षा आटोपून यायचे असे ठरलेआम्हाला भुसावळ किंवा जळगावला गाडी बदलावी लागत असेजळगांव येण्याची वेळ सकाळी पाच आणि पुढे धरणगांवची गाडी सात वाजता -- त्यामुळे मी घरी यायला आठ तरी होणार हा सर्वांचा हिशोबपण रात्री मी चुकून भुसावळलाच उतरले आणि समोरच भुसावळ-सूरत फास्ट लागली होती ती पकडून पाच वाजताच मी धरणगांव स्टेशनवर उतरलेअंधारी रात्रपण कोटावर जाणारी दोघ -तिघ होती त्यांच्या सोबतीने मी तशा आंधारातच घरी पोचले देखील -- आणि अचानक मला जाणवले -- या गावात आपण कधीही कुठेही बिनदिक्कत जाऊ-येऊ शकतो -- जणू सगळा गांव हे माझ्या घराचे आंगणचगॉन विथ दी विण्ड या कादंबरीतील नायिका म्हणते की कधीही संकट आले की आपल्या जन्मगावी येऊन तिला स्वस्थता लाभे आणि मार्गही दिसे -- तशीच माझीही अवस्था धरणगावच्या बाबतीत आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------





नमस्कार 
माझे शिक्षण बिहारमधे व उन्हाळ्याच्या सुटीत धरणगांवी येऊन इथले वातावरण मनात साठवून घ्यायचे असा तो प्रवास होता. त्यामधे बालकवींची विशेष माहिती नव्हती. फक्त धरणगांव या विषयावर लिहू शकेन, पण तुम्हाला तसे चालत असेल तर. --LM

प्रिय डॉ देशपांडे,
लेख पाठवीत आहे. कृपया पोच द्यावी --LM
प्रति,

माननीय लीना मेहेंदळे madam,
सप्रेम नमस्कार. 
महोदया,
सर्वप्रथम आपल्याला दिवाळीच्या शुभेच्छा. 
जडण घडण मासिकाचा दिवाळी विशेषांक आपल्याला पाठवायचा आहे. आपण पुण्यात असाल तर कोणत्या पत्तावर अंक पाठवावा (फोन नंबरसह ) हे समजल्यास त्यानुसार अंक व मानधनाचा धनादेश पाठवणे सोयीचे होईल. 
आपला नम्र,
सागर देशपांडे 9850038859
------------------------------------------------