मराठीसाठी वेळ काढा

मराठीसाठी वेळ काढा

मराठीत टंकनासाठी इन्स्क्रिप्ट की-बोर्ड शिका -- तो शाळेतल्या पहिलीच्या पहिल्या धड्याइतकाच (म्हणजे अआइई, कखगघचछजझ....या पद्धतीचा ) सोपा आहे. मग तुमच्या घरी कामाला येणारे, शाळेत आठवीच्या पुढे न जाउ शकलेले सर्व, इंग्लिशशिवायच तुमच्याकडून पाच मिनिटांत संगणक-टंकन शिकतील. त्यांचे आशिर्वाद मिळवा.

Monday, December 3, 2012

Q 21 कंपनी म्हणजे काय (अजून इथे नाही)

प्रश्न २१ - कंपनी म्हणजे काय. कंपनी या संकल्पनेची सुरवात व फिलॉसफी काय?

Q 18, 19, 20 डीटीपी झाले

डायरी दि 30 जाने ते 3 फेब्रु
प्रश्न १८,

प्रश्न १८ बँकांच्या खर्च व मिळकतीच्या बाबींचा मेळ कसा घातला जातो?

उत्तर- बँकेच्या खर्चात चार गोष्टींचा समावेश होतो. पैकी पहिली म्हणजे ऑफिस चालविण्याचा खर्च, माणसांचे पगार इत्यादी . दुसरी म्हणजे ज्या ठेवी बॅकांकडे येतात त्यावर द्यावे लागणारे व्याज . तीसरी बाब म्हणजे रिझर्व्ह बॅकच्या नियमाप्रमाणे बँकांना त्यांच्याकडे काही पैसा गंगाजळी म्हणजे रिझर्व्ह मध्ये ठेवावा लागतो. चौथा म्हणजे वसूल न झालेले व न होऊ शकणारे कर्ज . चौथ्या गोष्टीला नाॅन- पर्फोमींग- असेट असेही म्हणतात.
हे चारही प्रकारचे खर्च भरून काढताना बँक ज्यांना कर्ज देते त्यांच्याकडून मिळणारे व्याज हे बँकेचे उत्पन्न असते. याशिवाय बँकेकडे ठेवी घेतात. ते पैसे बँकेकडे ठेवलेले असतात कारण ते लगेच परत करायचे नसतात. यातलाच काही पैसा बँक कर्ज म्हणून देते व उरलेला पैसा गंगाजळी म्हणून दाखवते. बँककडे असलेल्या ठेवींवर जेंव्हा १० टक्के व्याज दिले जाते तेव्हा बँकेकडून कर्ज घेणाऱ्याला  १८ ते २० टक्के व्याजाचा दर लावावा लागतो. कारण या फरकातूनच बँकेच्या खर्चाची  जुळणी होते. 
प्रश्न 19 

प्रश्न 19 - खाजगी सावकारांचा धंदाही याच तऱ्हेने चालतो का?

होय. खरं तर तिथेही हेच तत्व आहे. पण दोन तीन फरक आहेत. खाजगी सावकर छोट्या प्रमाणावर वावरतो. त्याची उलाढाल देशभरांत होत नसते. तो वसूली बाबत जास्त काटेकोर असतो-  सुरवातीला त्याचाच पैसा या धंद्यात लागलेला असतो. म्हणून मग त्याचे व्याजाचे दर जास्त असतात.  त्याला लागणारे  तारणही  मोठे असते. 

आपल्या देशात खाजगी सावकरी हा गुन्हा ठरवलेला आहे व ------------  अॅक्ट अंतर्गत खाजगी सावकराविरुद्ध कारवाई होऊ शकते .
प्रश्न २० 

प्रश्न २० तारण म्हणजे काय
बँका किंवा खाजगी सावकर जेंव्हा कुणाला कर्ज देतात त्यावेळी कर्जाची परतफेड खात्री पूर्वक होईल असेही त्यांना बघावे लागते. यासाठी कर्ज घेणार्याकडील काही वस्तू तारण म्हणून लिहून किंवा ठेऊन  घेतली जाते- उदाहरणार्थ जमीन किंवा -  सोन्या चांदीचे दागिने, किंवा उद्योगाची मशीनरी इत्यादी. ती व्यक्ती कर्ज फेडू शकली नाही तर तारण म्हणून ठेवलेली वस्तू जप्त होते, म्हणजे ती बँकेच्या ताब्याची होते व ती विकून जो पैसा मिळेल तो कर्ज वसूली म्हणून दाखवला जाते.

प्रश्न- बँकाना बरीच विशेषणे लावलेली दिसतात. तर बँका किती प्रकारच्या असतात?
आपल्या देशांत राष्ट्रीकृत बँका , नाॅन नेशनलाइझ्ड बँका , का्ॅआपरेटिव्ह बँका, लॅण्ड डेव्हलपमेंट बँका , हाउसिंग फायनांस बँका , इन्फ्रास्ट्र्कचर फायनांस बँका अशा विविध प्रकारच्या बँका आहेत. त्यांचे वेगवेगळे कायदे आणि वेेगवेगळे फायदे आहेत.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------

yyy Q 17 खाण्यापिण्याच्या गोष्टींचे स्टॅण्डर्डायझेशन

डायरी दि 27-28-29 जानेवारी ( डायरीबरहुकूम)
प्रश्न १७

प्रश्न १७ सध्या खाण्यापिण्याच्या खूप गोष्टी पॅकेटबंद मिळतात. त्यांच्या सोई- गैरसोई गुण- दोष काय ?

बरोबर ! माणसाला खूपदा तयार पदार्थांची गरज असते कारण पदार्थ तयार करत बसायला वेळ नसतो. आपण पोहे, भाजलेले चणे, दाणे, पापड, खाकरा, चकली असे पदार्थ तयार खाद्य म्हणून वापरतो

पण जस जस लोकांचा जीवन गतिमान होउ लागल तस तस त्याला तयार वस्तुंची गरज वाढू लागली. मग तयार लोणची, तयार साॅस, तयार मसाले, तयार नूडल्स, तयार पिझ्झा, तयार जूस- जॅम- जेली, अशा गरजा वाढत गेल्या. त्या बनवणा-या कंपन्या अस्तित्वात आल्या. मग एक प्रश्न निर्माण झाला तो म्हणजे ब्रॅण्डचा. 

समज एक कंपनी आस्वाद या नावाने नुडल्स करत आहे. त्यांचे २०० ग्रॅमचे पाकिट आहे. मी ते घरी जाउन कापणार व उकळत्या पाण्यात सोडून दोन मिनिटांत माझा नाश्ता तयार करणार . पण त्याची चव कशी असेल ? मी चार दिवसांपूर्वीजे पाकिट आणल होत तशीच चव आजही असेल का? किंवा मी दुस-या शहरात जाउन तिथेही आस्वाद नूडल्स पाकिट घेतली तरी त्याचीही चव तशीच असेल का?

तर चव तशीच असल्याची गॅरंटी असेल तर एक फायदा होतो- मी ती वस्तू विकत घेत असताना मला तिच्याबद्दल थोडी कल्पना किंवा थोडी खात्री असते.  यालाच स्टेंण्डर्डाझेशन असे म्हणतात. ते टिकवण्यासाठी उत्पादक कंपनीला प्रयत्न करावे लागतात. दरवेळी चव सारखीच ठेवण्यासाठी त्या पदार्थात प्रत्येक गोष्ट एका ठरावीक प्रमाणातच टाकावी लागणार. अशा प्रकारे त्या पदार्थांचा एक फॉर्म्यूला तयार झाला. तो फॉर्म्यूला  इतरांना कळू द्दाायचा नाही-  गुप्त ठेवायचा याचीही काळजी घ्यावी लागते. यासाठी कंपनीच्या नावाचे रजिस्ट्रेशन, लोगो, ब्रँण्ड, आणि फॉर्म्युल्याची हक्कनोंदणी असे कायदेशीर उपाय करतात. 

पण अशा स्टेंण्डर्डाझेशन एक तोटाही असतो. कधीही खा, तीच चव. याचा कंटाळा येऊ लागतो. सुरवातीला छान चविष्ट वाटणारा पदार्थ त्याच त्या चवीमुळे नकोसा होतो. चेन होटेलमधेही हाच प्रकार होतो. 

यावर उपाय असा कि एकच पदार्थ बनवणाऱ्या  पण  गावागावांचे वैशिष्टे जपणाऱ्या अशा वेगवेगळ्या कंपन्या असतील तर हा कंटाळा कमी होऊ शकतो. पण अशी गावा-गावांचे वैशिष्टेय सांगणारे खाद्य पदार्थ निर्माण करण्याचे तंत्र अजून आपल्या कडे मोठ्या प्रमाणावर नाही. 

मात्र एकाद्या फूड फेस्टीवल मध्ये आपल्याला गावोगावचे विविध प्रकार चाखायला मिळू शकतात उदा, कोल्हापूरी, खान्देशी, मालवणी, गोवन, पंजाबी  वगैरे.  जसा हा कंटाळा खाद्यपदार्थांच्या बाबतीत होऊ शकतो तसाच तो इतरही बाबतीत होउ शकतो. उदा एकच धर्तीचे कपडे किंवा एकच  प्रकारची ग्रीटींग कार्ड्स. थोडक्यात स्टेंण्डर्डायझेशनचे खूप फायदे आहेत. मात्र त्यांचा कंटाळा हा मोठा धोक्याचा तोटा आहे.










Q 16 डीटीपी झालेले नाही



Q 14, 15 डीटीपी झालेले नाही



Q 12, 13 डीटीपी झालेले नाही



Q -11