मराठीसाठी वेळ काढा

मराठीसाठी वेळ काढा

मराठीत टंकनासाठी इन्स्क्रिप्ट की-बोर्ड शिका -- तो शाळेतल्या पहिलीच्या पहिल्या धड्याइतकाच (म्हणजे अआइई, कखगघचछजझ....या पद्धतीचा ) सोपा आहे. मग तुमच्या घरी कामाला येणारे, शाळेत आठवीच्या पुढे न जाउ शकलेले सर्व, इंग्लिशशिवायच तुमच्याकडून पाच मिनिटांत संगणक-टंकन शिकतील. त्यांचे आशिर्वाद मिळवा.

Tuesday, November 13, 2012

नरेंद्र गोळे यांनी करून दिलेला अनुदिनी परिचय-३: प्रशासनाकडे वळून बघतांना


नरेंद्र गोळे यांनी करून दिलेला 

अनुदिनी परिचय-३: प्रशासनाकडे वळून बघतांना

अर्थशास्त्र Q 8 बलुतेदारीची प्रथा, ९, 10 jpg

अर्थशास्त्र  8  – बलुतेदारीची प्रथा
 प्रश्न ८– बलुतेदारीची प्रथा कुठून आली? ती कशी होती? आणि आता तिची अवस्था काय आहे?
उत्तर – माणसाने खाण्यासाठी लागणारे अन्न शेतात पिकवायची कला शिकून घेतली. शेती सुरू झाली पण माणसाला त्याखेरीज  इतरही गरजा असतात उदा. कापड हवं, कपडे हवेत, मातीीची, काचेची. तांबा-पितळ-लोखंडाची भांडी हवीत इत्यादी. या वस्तूंची निर्मिती कशी करावी ही कला पण माणसाने शिकून घेतली. मग काही व्यक्ति शेती न करता या गोष्टी तयार करू लागली. म्हणजेच इतर उद्योग सुरू झाले. प्रत्येक गावांत लोकांना गरजा पुरवण्यासाठी न्हावी, शिंपी, चांभार, लोहार, विणकर, कुंभार, माळी अशा उद्योगातली माणसं हवी असत. त्यांना मानाने गावांत बोलाऊन घेतले जाई व वसवण्यांत येई. यांनाच बलुतेदार म्हटले गेले.

यांनी निर्माण केलेल्या वस्तूंबाबत एक लक्षांत ठेवावे लागेल. कुंभाराचं उदाहरण घेऊ या. त्याच प्रत्येक  मडकं वेगवेगळं घडवावं लागतं. प्रत्येकाला घडतांना  हाताने आकार द्यावा लागतो. म्हणजेच  दोन मडकी तंतोतत सारखी नसणार,  तसेच तो कुंभार एकाच वेळी दहाबारा मडकी तयार करू शकणार नाही,  एक एक करूनच करणार.  यामुळे करतांना वेळ लागणार.  मात्र औद्योगिक क्रांतिनंतर ही परिस्थिती बदलली. 
------------------------------------------------------------------
प्रश्न ९ – सर्वसाधारणपणे लोकांची समजूत अशी असते की अर्थशास्त्र हा विषय 
औद्योगिक क्रांतिनंतरच महत्वाला आला. हे कितपत खरे आहे  ?

उत्तर -- थोडेफार खरे आहे पण अगदी खरे नाही. अर्थशास्त्राचा पाया रचला गेला तो आधी समाज-व्यवस्थेतून आणि नंतर राज्य- व्यवस्थेतून . उत्पादन-व्यवस्था हा तिसरा टप्पा आहे. 
म्हणून आपण जेंव्हा समाज-शास्त्र शिकतो, त्यांतही अर्थशास्त्र असते आणि जेंव्हा राज्य-शास्त्र शिकतो, त्यांतही अर्थशास्त्र असते . उत्पादन व्यवस्था बदलली तशी समाज-व्यवस्था आणि राज्य-व्यवस्था पण बदलली. त्यांचा प्रभाव राजकारणावर कसा झाला हे ही शिकावे लागेल. त्यामुळे हे तीनही विषय एकमेकांशी निगडित आहेत.
----------------------------------------------------------------------------
प्रश्न १० -- समाजरचना आणि अर्थव्यवस्थेचा संबंध कसा तयार झाला ?

10








अर्थशास्त्र Q 6, 7,--jpg

अर्थशास्त्र  6, 7,